गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी संधी ! LIC चा आयपीओ आजपासून खुला

LIC IPO Updates : बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे.  

Updated: May 4, 2022, 11:44 AM IST
गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी संधी ! LIC चा आयपीओ आजपासून खुला title=

मुंबई : LIC IPO Updates : बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे. देशातील गुंतवणूकदारांना 9 मेपर्यंत या आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. ( LIC IPO open for subscription)

एलआयसीचा आयपीओ आजपासून ते 9 मे 2022पर्यंत खुला झाला आहे. एलआयचीचा हा आयपीओ 17 मे रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. आयपीओची प्राईज बैंड 902 ते 949 रुपये असणार आहे. पॉलिसहोल्टर्सला 60 रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच LIC कर्मचाऱ्यांना 45 रुपये सूट  असणार आहे. एका लॉटमध्ये 15 शेअर खरेदी करावे लागणार आहेत.

एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. सवलतीच्या दरात त्यांना आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे. एलआयसीचा हा शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आहे. केंद्र सरकार एलआयसीचा 3.5 टक्के हिस्सा बाजारात विक्री करणार असून त्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभा करणार आहे.

 एलआयसीच्या पॉलिसीधारकांना आयपीओ किंमतीवर प्रति समभाग 60 रुपये किंवा 6 टक्क्यांची सूट मिळणार आहे. तर, कर्मचारी, रिटेल गुंतवणूकदारांना प्रति समभाग जवळपास ५ टक्के किंवा ४५ रुपयांची सवलत मिळणार आहे.