Weather Updates : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी हवामानाची स्थिती जाणून घ्या? IMD चा पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट

Weather Updates: उष्णतेने हैराण झाल्यानंतर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत आहात, तर आधी हवामान खात्याचे अपडेट जाणून घ्या. हवामान खात्याने पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.

Updated: May 4, 2022, 08:35 AM IST
Weather Updates : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी हवामानाची स्थिती जाणून घ्या? IMD चा पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट title=

मुंबई :  Weather Updates: जर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर हवामानाची स्थिती जाणून घ्या? IMD ने हा इशारा जारी केला आहे. उष्णतेमुळे होरपळणाऱ्या उत्तर-पश्चिम भारतात मंगळवारी दिलासा मिळाला. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात सुमारे 2-3 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली. येत्या 5 दिवसांत उष्णतेची लाट आता कमी होईल, असे हवामान खात्याने सांगितले. म्हणजेच 7 मेपर्यंत उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

हवामानात 2-3 अंश सेल्सिअसची घसरण  

उत्तर-पश्चिम राजस्थान आणि दक्षिण हरियाणाच्या वेगळ्या भागांशिवाय मंगळवारी देशभरात उष्णतेची लाट नव्हती. त्यामुळे देशातील कोणत्याही भागात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले नाही. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या म्हणण्यानुसार, राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि हरियाणाच्या कमाल तापमानात गेल्या 24 तासांत 2-4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

पुढील 5 दिवस उष्णतेची लाट येणार नाही

उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश भागात पुढील 5 दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही, असा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे. तथापि, बुधवारपासून महाराष्ट्रातील कमाल तापमानात 2-4 अंश सेल्सिअसने वाढ होईल, तर देशाच्या इतर भागात कोणताही विशेष बदल अपेक्षित नाही. IMD नुसार, 5 दिवसांनंतर हवामान पुन्हा 2-3 अंश सेल्सिअसने वाढेल.

मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा

दरम्यान, हवामान खात्याने (IMD) हिमाचल प्रदेशात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकेल, असे विभागाने सांगितले. आदल्या दिवशीही सिमल्यासह राज्यातील अनेक भागात पाऊस आणि गारपीट झाली, त्यामुळे राज्याचे तापमान खाली आले आहे. विभागाने 4 मे रोजी चंबा, कांगडा, मंडी, सिरमौर, सोलन येथे गारपिटीसह जोरदार वाऱ्यांबाबत यलो अलर्ट जारी केला आहे.