मुंबई : LIC चा IPO लवकरच शेअर बाजार येणार आहे. हा देशातील सर्वात मोठा IPO असणार आहे. 4 मे रोजी गुंतवणूकीसाठी खुला होईल आणि 9 मे रोजी बंद होईल. तुम्ही देखील या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची आधीच माहिती असायलाच हवी.
LIC च्या IPO चा प्राइस बँड रु. 902 ते 949 रु. दरम्यान असेल. विमा कंपनी या IPO च्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभारण्याचा तयारीत आहे. त्यासाठी 3.5 टक्के हिस्सा विक्री करण्यात येणार आहे.
LIC च्या IPO चा एकूण इश्यू आकार 22.13 कोटी शेअर्सचा असेल. यापैकी 10 टक्के म्हणजेच 2.21 कोटी शेअर्स पॉलिसीधारकांसाठी राखीव आहेत. तर 0.15 कोटी शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील.
कर्मचारी आणि पॉलिसी धारकांच्या आरक्षणानंतर उर्वरित शेअरधारकांपैकी, 50% (संस्थास्मक गुंतवणूकदारांसाठी) QIB साठी, 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15% NII साठी असतील. या
902 ते 949 रुपयांच्या प्राइस बँडसह LIC च्या या शेअरमध्ये एका लॉटमध्ये 15 शेअर्स असतील. म्हणजेच तुम्हाला किमान 13530 रुपये गुंतवावे लागतील.
IPO वर किरकोळ गुंतवणूकदारासाठी 45 रुपये आणि पॉलिसीधारकासाठी 60 रुपये सूट निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच 15 शेअर्समध्ये पॉलिसीधारकाला 900 रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो.
IPO साठी LIC चे मूल्यांकन 6 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. याआधी सरकारची 5 टक्के हिस्सेदारी विकून 30 हजार कोटी रुपये उभे करण्याची योजना होती. मात्र आता केवळ 3.5 टक्के हिस्सा विकला जाणार आहे.