LIC च्या या योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा फायदा

बायकोच्या नावाने गुंतवा फक्त 29 रुपये आणि मिळणार 4 लाखांचा फायदा, पाहा LIC ची जबरदस्त योजना

Updated: Jan 22, 2022, 07:37 PM IST
LIC च्या या योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा फायदा  title=

मुंबई : LIC दरवेळी आपल्या ग्राहकांसाठी खास गुंतवणुकीसाठी योजना आणत असते. सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून या योजना आणल्या जातात.  कमी पैशांची गुंतवणूक करून तुम्हाला जर जास्त फायदा मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी ही योजना खास आहे. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. 

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या सर्वोत्तम योजनेबद्दल सांगणार आहोत. लोकांचा LIC च्या पॉलिसीवर विश्वास आहे. कारण इथे जोखीम उचलली तरी धोक्याची शक्यता फार क्वचित आहे. महिला ग्राहकांना स्वावलंबी बनवण्यासाठी एलआयसीने विशेष धोरण आणले आहे.

तुमच्या पत्नीच्या किंवा घरातील स्त्रीच्या नावाने या योजनेत पैसे गुंतवू शकता. त्याचा फायदा 4 लाख रुपयांपर्यंत होणार आहे. कसा ते एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा तुमचे वय ३० वर्षे असेल आणि 20 वर्षे दररोज 29 रुपये जमा केले, तर पहिल्या वर्षी तुमच्याकडे एकूण 10,959  रुपये जमा होतील. 
आता त्यातही 4.5 टक्के कर लागणार आहे. पुढील वर्षी तुम्हाला 10,723 रुपये द्यावे लागतील. अशाप्रकारे, तुम्ही हे प्रीमियम प्रत्येक महिना, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर जमा करू शकता. तुम्हाला 20 वर्षांमध्ये 2,14,696 रुपये जमा करावे लागतील आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण 3,97,000 रुपये मिळतील.

या योजनेच्या अटी काय आहेत? 
LIC आधार शिला योजनेंतर्गत, किमान 75000 रुपये आणि कमाल 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. या पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी कमीत कमी 10 वर्षे आणि जास्त 20 वर्षे आहे. तुम्ही महिन्याला किंवा तीन महिन्याचे किंवा वर्षाचे एकदम पैसे देखील भरू शकता. यासाठी तुम्ही कसे पैसे भरायचे आहेत ते निवडायचं आहे. 

एकदम 100 रुपये वाचवणं कठीण वाटतं पण रोज 29 रुपये वाचवले तर जवळपास तुम्ही 4 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळवू शकता. ही योजना महिलांच्या हितासाठी करण्यात आली आहे. त्याला शिला योजना असंही नाव देण्यात आलं आहे. 8 ते 55 वयोगटातील मुली आणि महिलांसाठी ही योजना आहे.