नवी दिल्ली : आतापर्यंत बिबट्या घरात घुसून पिल्लं किंवा कुत्र्याला साखळीसकट ओढून नेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र चक्क भलमोठं गेट लावूनही आता बिबट्यापासून सुरक्षित राहाणं शक्य नसल्याचं ह्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
भलामोठा बिबट्या अगदी सहज गेटवरून उडी मारून घरातच्या आवारात शिरला. त्याने कुत्र्याला पकडलं आणि जिवंत कुत्र्याला ओढत आपल्यासोबत पुन्हा गेटवरून उडी मारून निघून गेला. या व्हिडीओमधून बिबट्याची किती ताकद असू शकते याचा अंदाज येईल.
IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताच वेगानं व्हायरल झाला आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ लखनऊ इथला असल्याचा दावा केला आहे. मात्र तो नेमका कोणत्या भागातला आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
बिबट्याकडून कुत्र्याच्या शिकारीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तुमच्या घरात अशा प्रकारे पाळीव प्राणी असेल आणि जरी गेट भलमोठं असेल तरी सावध राहा. कारण बिबट्या एवढ्या उंच गेटवरूनही अगदी सहज येऊ शकतो हे तरी यावरून स्पष्ट होत आहे.
See that leopard. Others don’t stand a chance. Via WA. pic.twitter.com/Ha3X9eBwWl
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) December 24, 2021