नवी दिल्ली : Driving License : लर्निंग लायसन्सची (Learning Driving License ) मुदत संपली तरी तुम्हाला दंड होणार नाही. दिल्ली सरकारने मंगळवारी वाहन शिकणार्यांचे परवाने फेब्रुवारी 2020 ते नोव्हेंबर 2021 दरम्यान संपले आहेत., त्यांच्यासाठी लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्सची (Learning Driving License) वैधता 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. कोविड-19 महामारीच्या काळात लोकांना ड्रायव्हिंग चाचणीसाठी स्लॉट मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्ली परिवहन विभागाने आदेशाची प्रत ट्विट केली आहे. विभागाने ट्विटमध्ये म्हटले की, 'अनेक लोकांकडून विनंती आली होती. दिल्लीत लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स धारकांना (Learning Driving License) चाचणीसाठी स्लॉट (DL Test Slots) मिळवण्यात अडचणी आल्या आहेत. हे लक्षात घेऊन, आम्ही त्यांना लर्निंग लायसन्सची वैधता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 31 जानेवारी 2022 पर्यंत दोन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे, ज्याची वैधता 1 फेब्रुवारी 2020 ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान संपली आहे. म्हणजेच या काळात तुमच्या परवान्याची मुदत संपल्यामुळे चालान कापले जाणार नाही.
Considering numerous requests received & keeping in mind difficulties faced by Delhi Learning License holders in getting slots for Driving license test, we have extended validity of LL that has expired between 01.02.20 & 30.11.21 for 2 more months,i.e, till 31.01.22. pic.twitter.com/8GBnxyjhao
— Transport for Delhi (@TransportDelhi) November 30, 2021
दिल्ली परिवहन विभागाने आपल्या फेसलेस सेवा मॉडेल अंतर्गत ई-लर्नर परवाना सुविधा सुरू केली आहे. जी अर्जदारास त्यांच्या घरातून किंवा कामाच्या ठिकाणी ड्रायव्हिंग चाचणी देण्यास अनुमती देते. आता दिल्लीतील लोक लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदारांना कोणत्याही विभागाच्या कार्यालयात न जाता ऑनलाइन ड्रायव्हिंग चाचणी देण्यासाठी स्लॉट दिले जात आहेत. ऑनलाइन चाचणी उत्तीर्ण झालेल्या अर्जदारांच्या घरी शिकण्याचा परवाना पाठवला जातो.