मुंबई : देशातील सर्वात अत्याधुनिक मानली जाणारी तेजस एक्सप्रेस जेव्हा प्रवाशांसाठी सुरु झाली तेव्हा तिची हालत अशी झाली की तेव्हाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देखील त्याची कल्पना केली नसेल.
या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी सिनेमा पाहण्यासाठी, गेम खेळण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी सुविधा देण्यात आल्या होत्या. मोठ्या उत्साहाने रेल्वे ही ट्रेन लाँन्च केली होती पण प्रवाशांच्या चुकीच्या वर्तनामुळे आता रेल्वने एलसीडी स्क्रीन हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदाबाद-मुंबई शताब्दी एक्सप्रेसमध्ये देखील एलसीडी स्क्रीन्स लावण्यात येणार होत्या पण आता त्या न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेच्या या एलसीडी स्क्रीन्सच्या वायर तुटलेल्या स्थितीत, स्क्रीनला नुकसान, बटणं तुटलेल्या स्थितीत मिळत होते. त्यामुळे रेल्वेने ही सुविधा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.