Lawrence Bishnoi:लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर होते अनेक बॉलिवूड स्टार्स, तपासात उघड झाला प्लान

Salman Khan Threat Letter Case: लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठी नावं असल्याचं समोर आलं आहे

Updated: Jun 10, 2022, 08:32 PM IST
Lawrence Bishnoi:लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर होते अनेक बॉलिवूड स्टार्स, तपासात उघड झाला प्लान  title=

Lawrence Bishnoi Gang: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moose Wala) हत्या आणि बॉलिवूड स्टार सलमान खानला (Salman Khan) धमकीचं पत्र. या दोन्ही प्रकरणांचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी (Lawrence Bishnoi Gang) जोडला जात आहे. एकीकडे मुंबई पोलीस, गुन्हे शाखा, महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस स्पेशल सेलची टीम सलमान खानला दिलेल्या धमकीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात गुंतले आहेत. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी (Pune Police) नुकतीच सौरभ महाकाळ उर्फ ​​सिद्धेश कांबळे (20) याला अटक केली आहे.

सौरभ महाकाळला (Saurabh Mahakal) अटक केल्यानंतर त्याचा जबाब नोंदवण्यात आला. यात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठी नावं होती. ही टोळी या स्टार्सकडून वसुली करण्याचा डाव आखत होती. या प्रकरणात अनेक मोठी नावे समोर आली असून तपास यंत्रणा आता अधिक तपास करत आहे. 

पुण्यात बनवणार होते गँग
सौरभ महाकाळ याच्यासोबत आणखी 2 जण काम करत असल्याचेही तपासात समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्याही रडारवर 10 हून अधिक लोक आहेत, जे बिश्नोई टोळीसाठी काम करत होते. ही टोळी पुण्याच्या आसपास एक गॅंग बनवत होती. आता महाकालच्या टीममधील कोण कोण होते याचा तपास एजन्सी करत आहेत.

बिश्नोई टोळीने सलमानला पाठवलं होतं धमकीचे पत्र 
लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तीन कार्यकर्त्यांनी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवलं होतं . गुंड विक्रम ब्रारच्या कटाचा तो एक भाग होता, पिता-पुत्रांना धमकावून खंडणी उकळण्याचा त्यांचा उद्देश होता. विक्रम ब्रार हा कॅनडामध्ये राहणारा गँगस्टर गोल्डी ब्रारचा भाऊ आहे.

गोल्डी ब्रार हा बिश्नोई टोळीचा भाग असून त्याने मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक सध्या तिथे पोहचलं आहे आहे.