मुंबई : मारुती सुझुकी कंपनीच्या कार स्वस्तात खरेदी करण्याची आणखी एक सुवर्णसंधी आली आहे. जानेवारी 2022 मध्ये, मारुती सुझुकी अल्टो, वॅगनआर, स्विफ्ट, डिझायर आणि विटारा ब्रेझा वर एकूण 33,000 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट कंपनीने जारी केले आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ऑफर्सच्या नियम अटी बदलू शकतात. जाणून घेऊ या काय आहेत ऑफर्स...
मारुती सुझुकी अल्टो (maruti alto )
मारुती सुझुकी अल्टो, अनेक दशकांपासून छोट्या कुंटूबासाठी ग्राहकांची आवडती कार आहे, कंपनीने कार खरेदीसाठी 33,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर जाहीर केल्या आहेत. ज्यात 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. या ऑफर बेस मॉडेल STD सह उपलब्ध नाहीत. अल्टोची एक्स-शोरूम किंमत 3.15 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी एस-प्रेसो ( maruti s presso )
या कारवर 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देण्यात आला आहे. कॉर्पोरेट डिस्काउंटसाठी, ग्राहकांना 3,000 रुपयांचा फायदा मिळेल. S-Presso ची एक्स-शोरूम किंमत 3.78 लाख रुपये आहे.
मारुती Eeco
कंपनीने या मौल्यवान कारवर एकूण 23,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर जारी केल्या आहेत. यामध्ये 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. रुग्णवाहिकेच्या वर्जनवर फक्त कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे. कारची एक्स शोरूम किंमत 4.38 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी वॅगनआर (maruti wagon r)
कंपनीने WagonR वर एकूण 23,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या आहेत. यामध्ये 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. कंपनीने या ऑफर्स कारच्या सर्व प्रकारांना दिल्या आहेत. मारुती सुझुकी वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत 4.93 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)
कंपनीने या कारवर एकूण 13,000 रुपयांचा डिस्काउंट दिला आहे. यामध्ये 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. . कारची एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख रुपये आहे.
मारुती स्विफ्ट/डिझायर (Maruti Swift)
मारुती सुझुकीच्या या दोन्ही कारवर एकूण 23,000 ऑफर्स उपलब्ध आहेत. या फायद्यांमध्ये 10,000 रुपयांपर्यंतचे कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. स्पेशल एडिशन व्हेरियंटच्या खरेदीवर 18,500 रुपये वेगळे द्यावे लागतील. स्विफ्ट आणि डिझायरची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 5.85 लाख आणि 5.99 लाख रुपये आहे.