लष्कर-ऐ-तैयबाचा कमांडर अबु दुजानाला जवानांनी केलं ठार

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये काकापोरा येथे सुरक्षारक्षकांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अबु दुजानाला ठार केलं आहे. दुजाना हा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीर कमांडर होता.

Updated: Aug 1, 2017, 09:55 AM IST
लष्कर-ऐ-तैयबाचा कमांडर अबु दुजानाला जवानांनी केलं ठार title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये काकापोरा येथे सुरक्षारक्षकांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अबु दुजानाला ठार केलं आहे. दुजाना हा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीर कमांडर होता.

सुरक्षा रक्षकांना लष्करचा कमांडर अबु दुजानासह ३ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दुजानावर लाखो रुपयांचं बक्षीस होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सुरक्षा रक्षकांनी ज्या घरात हे दहशतवादी लपून बसले होते ते घर विस्फोटकाने उडवलं. सुरक्षा रक्षकांनी २ दहशतवाद्यांना ठार केलं आहे तर तिसऱ्या दहशतवाद्याचा शोध सुरु आहे.