Laptop Cleaning Tips: लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी 'या' घरगुती टीप्स करा फॉलो

How to Clean Laptop at Home: आज लॅपटॉप आणि वायफाय (Laptop Cleaning) आपली गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणे लॅपटॉप ही आपली महत्त्वपुर्ण गरज झाली आहे. आपला लॅपटॉप हा अनेकदा खराब होत असतो त्यासाठी आपल्याला तो स्वच्छ (Laptop Cleaning Tips and Tricks) करणेही अपरिहार्य असते. अशावेळी जाणून घ्या की तुम्ही घरच्या घरी कसा काय लॅपटॉप स्वच्छ कराल? 

गायत्री हसबनीस | Updated: Apr 9, 2023, 04:47 PM IST
Laptop Cleaning Tips: लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी 'या' घरगुती टीप्स करा फॉलो title=

Laptop Cleaning Tips: आजकाल आपण सगळेच लॅपटॉपचा (Laptop Cleaning Tips) वापर करतो. प्रोफेनशल आणि कॉर्पोरेटला लाईफमध्ये आपल्याला लॅपटॉपशिवाय (Steps to Clean Laptop) पर्याय नाही. अगदी विमानात प्रवास करताना आणि कुठेही प्रवास करताना आपल्यालाही लॅपटॉपची गरज लागते. त्यातून आता वर्क फ्रॉम होम वाढल्यानं आपल्यासाठी लॅपटॉप तर फारच गरजेचा असतो. त्यामुळे आपल्याला आपले हे इक्विमेंट्स साफ ठेवणेही तितकेच गरजेचे असते. आपला लॅपटॉप जर का (How Can I Clean Laptop at Home) तुम्हाला स्वच्छ ठेवायचा असेल तर तुम्हाला काही साध्या ट्रीक्स वापरणं आवश्यक आहे.

तुम्ही घरच्या घरही तुमचा लॅपटॉप स्वच्छ करू शकता. तुम्हाला फार काही वेगळं करायची अथवा पैसे खर्च करून कुठू सर्व्हिस सेंटरमध्येही (Cleaning Tips) जाण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया की लॅपटॉप स्वच्छ करण्याच्या सोप्प्या टीप्स कोणत्या? आपल्या लॅपटॉपवर अनेकदा धुळ बसते त्यातून खासकरून आपल्या लॅपटॉपची स्क्रिनही अनेकदा खराब होत असते. यातही महत्त्वाचे म्हणजे तुमच्या लॅपटॉपच्या कीबोर्डला अनेकदा धुळ लागते आणि ते साफ करणंही आपल्यासाठी फार कठीण होऊन जाते. लॅपटॉपच्या आतल्या भागातही मोठ्या प्रमाणात धुळ साचलेली आपल्याला पाहायला मिळते. (laptop cleaning tips how to clean laptop at home know these easy steps)

  • सर्वप्रथम तुम्हाला जर का लॅपटॉप साफ करायचा असेल तर त्यासाठी एक दिवस निश्चित करा कारण लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला जास्त कालावधी लागू शकता. 
  • आपला लॅपटॉप हा स्वच्छ करायला घेतल्यानंतर तो सर्वप्रथम बंद करा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लॅपटॉपमधील बॅटरीही (Laptop Battery) काढू शकता. 
  • पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का स्क्रीन साफ करायची असेल तर तुम्ही आधी एक मायक्रोफायबर (Micro Fiber) असलेलं कापड घ्या आणि त्यानं हलक्या हातानं स्क्रिन साफ करा. 
  • हे लक्षात घ्या की तुम्ही कुठलाही मायक्रोफायबर कापडा घेत असाल तर तो पहिल्यांदाच वापरणारा असावा. 
  • चुकूनही टिशू अथवा टॉवल वापरू नका. तुम्ही त्याऐवजी डस्टर ब्रश *Duster Brush) वापरा. यात तुम्ही पॉलस्टिर फायबरचा (Polyster Fiber) ब्रशही वापरू शकता. 
  • बारीक पेटिंग ब्रशसारखे ब्रशही मिळतात त्यानं तुम्ही लॅपटॉपच्या की-बोर्डला अडकलेली धुळही साफ करू शकता. 

लॅपटॉप स्वच्छ करताना ही काळजी घ्या की तुम्ही पाणी लॅपटॉपच्या कुठल्याही भागाला लागत तर नाही ना? तेव्हा लॅपटॉप स्वच्छ करताना विशेष करून ही काळजी घ्या आणि कुठलेही कडक मटेरिअलचे कापड वापरू नका त्यानं तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनला स्क्रॅचेस पडण्याची (Avoid These Mistakes While Cleaning Laptop) शक्यता असते. तेव्हा योग्य त्या गोष्टींची काळजी घ्या. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)