कोर्टाच्या निकालानंतर लालूंनी दिली अशी प्रतिक्रिया

आरजेडीचे प्रमुख लालू यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. रांची सीबीआय स्पेशल कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 23, 2017, 05:14 PM IST
कोर्टाच्या निकालानंतर लालूंनी दिली अशी प्रतिक्रिया title=

मुंबई : आरजेडीचे प्रमुख लालू यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. रांची सीबीआय स्पेशल कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे.

चारा घोटाळ्यात एकूण २२ जणांवर आरोप होता पण त्यामध्ये लालूंसह १५ जणांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे तर ७ जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. 

आरजेडीने आता वरच्या कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे. लालू यादव यांनी देखील त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन निकालानंतर ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

लालू यादवांची प्रतिक्रिया