रांची : राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू यादव यांना रांची हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. देवघर कोषागार प्रकरणात शिक्षेचा अर्धा काळ पूर्ण झाल्यानंतर लालू यादव यांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी करताना रांची हायकोर्टाने लालू यादव यांना 50-50 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. पण कोर्टाने लालू यादव यांना पासपोर्ट कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
चारा घोटाळ्याशी संबंधित देवघर कोषागार प्रकरणात 23 डिसेंबर 2017 ला बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवलं होतं. या प्रकरणात सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने लालू यादव यांना साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावली होती. सुप्रीम कोर्टाच्या कायद्यानुसार, शिक्षेचा अर्धकाळ पूर्ण झाल्यानंतर आरोपीला जामीन दिला जावू शकतो. याच आधारावर लालू यादव यांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. इतर 2 प्रकरणात लालू यादवांना 5 आणि 7 वर्षाची शिक्षा झाली आहे.
लालू यादव हे चारा घोटाळ्यातील दुमका, देवघर आणि चाईबासा प्रकरणात शिक्षा भोगत आहे. सध्या प्रकृती बिघडली असल्याने त्यांना रिम्सच्या पेइंग वार्डमध्य दाखल करण्यात आलं आहे.
लालू यांना डायबिटीज, हायब्लड प्रेशर, हृदयविकार, क्रॉनिक किडनी डिजीज, फॅटी लीव्हर, पेरियेनल इंफेक्शन, हायपर यूरिसिमिया, किडनी स्टोन, फॅटी हेपेटायटिस, प्रोस्टेट अशा समस्या आहेत.