लालकृष्ण अडवाणींनी ४ दिवस आधीच सुरू केले त्यांच्या नव्वदीचे सेलिब्रेशन

देव दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी शनिवारी काशीमध्ये पोहचले.

Updated: Nov 5, 2017, 01:12 PM IST
लालकृष्ण अडवाणींनी ४ दिवस आधीच सुरू केले त्यांच्या नव्वदीचे सेलिब्रेशन title=

वाराणसी : देव दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी शनिवारी काशीमध्ये पोहचले.

येत्या ८ नोव्हेंबरला लालकृष्ण अडवाणी नव्वद वर्षांचे होणार आहेत. हा योग साधत त्यांनी कार्तिकी पौर्णिमेला काशीतील खिडकीया घाटावर ९० दिवे लावून वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू केले आहे. 
लालकृष्ण अडवाणींसोबत त्यांची मुलगी प्रतिभादेखील होती. मीडियाला माहिती देताना प्रतिभाने दिलेल्या माहितीनुसार यंदा आम्हाला  देव दिवाळी काशीमध्ये साजरी करण्याचं सौभाग्य मिळाले आहे. ८ नोव्हेंबर १९२७ म्हणजेच नव्वद वर्षांपूर्वी ज्या दिवशी लालकृष्ण अडवाणींचा जन्म झाला त्या दिवशीदेखील देव दिवाळी साजरी करण्यात आली होती.  

वाराणसीमध्ये देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात. यंदा सुमारे दोन लाख भाविक देव दिवाळीच्या सेलिब्रेशनसाठी आले होते. राजेंद्र प्रसाद, दशाश्वमेध, अहिल्या बाई आणि मनमंदिर घाटावर लाखो भाविक होते. दरम्यान गुजरात्च्या पूर्व मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांनी राजेंद्र प्रसाद घाटावर आरती पाहण्यासाठी आल्या होत्या. 
 
 काशीमध्ये कार्तिक पौर्णिमा ही देव दिवाळीच्या स्वरूपात साजरी केली जाते. शिव आणि विष्णूने मिळून त्रिपुरा या राक्षसाचा वध केला होता. या पाच दिवस  हा उत्सव साजरा केला जातो.