झारखंडनंतर सर्वात कमी सिंचन महाराष्ट्रात, गडकरींची माहिती

शेतक-यांच्या आत्महत्येला पाण्याची कमतरता जबाबदार असल्याचं मत नितिन गडकरी यांनी व्यक्त केलय. झारखंडनंतर सर्वात कमी सिंचन महाराष्ट्रात आहे. 

Updated: Sep 4, 2017, 05:54 PM IST
झारखंडनंतर सर्वात कमी सिंचन महाराष्ट्रात, गडकरींची माहिती title=

नवी दिल्ली : शेतक-यांच्या आत्महत्येला पाण्याची कमतरता जबाबदार असल्याचं मत नितिन गडकरी यांनी व्यक्त केलय. झारखंडनंतर सर्वात कमी सिंचन महाराष्ट्रात आहे. 

महाराष्ट्रात 18.8 टक्के सिंचन असून राज्यात पाण्याची समस्या असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री सिंचन योजना महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

जलसंसाधन मंत्रिपदाची सूत्र स्वीकारताच त्यांनी त्या विभागातील अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.