कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईसोबत उद्या होणार भेट

हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबरला पाकिस्तानात जाणार आहेत. 

Updated: Dec 24, 2017, 04:14 PM IST
कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईसोबत उद्या होणार भेट title=

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबरला पाकिस्तानात जाणार आहेत. 

व्यावसायिक विमानाने प्रवास

पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती देण्यात आलीय. २५ डिसेंबरला व्यावसायिक विमानाने कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई पाकिस्तानात पोहोचतील आणि त्याच दिवशी ते परततील. यावेळी पाकिस्तानातील भारतीय उप-उच्चायुक्त जे.पी सिंगदेखील त्यांच्यासोबत असतील. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिलीय.

२० डिसेंबरला व्हिसा जारी

२० डिसेंबर रोजी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने व्हिसा जारी केला होता. त्यामुळे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी जाण्याचा कुटुंबीयांचा मार्ग मोकळा झालाय. हेरगिरीसह दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या अपीलावरून मे महिन्यात शिक्षेला स्थगिती दिलीय.