कर्नाटकात आज भाजपाची कसोटी, १५ जागांवर मतदान सुरू

येदियुरप्पा सरकार टिकणार की पडणार?  

Updated: Dec 5, 2019, 07:38 AM IST
कर्नाटकात आज भाजपाची कसोटी, १५ जागांवर मतदान सुरू  title=

बंगळुरु : कर्नाटक विधानसभेतल्या १७ रिक्त जागांपैकी १५ ठिकाणी मतदान सुरू झालं. काठावर पास असलेल्या भाजपला सत्ता टिकवण्यासाठी १५पैकी किमान ६ जागा जिंकणं आवश्यक आहे. काँग्रेस आणि जेडीएस आमदार बंड करून बाहेर पडल्यामुळे कुमारस्वामी सरकार गडगडलं होतं. त्यानंतर या १७ आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्यामुळे ही पोटनिवडणूक होतेय. 

१७पैकी १३ जणांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिकिट मिळवलंय. आजच्या निवडणुकीत ९ महिलांसह एकूण १६५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेसनं सर्व १५ जागांवर तर जेडीएसनं १२ जागांवर उमेदवार उभे केलेत. 

९ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यावेळी येडियुरप्पा सरकार टिकतं की जातं, भाजप बहुमतापासून दूर राहिल्यास कोणतं नवं राजकीय समीकरण अस्तित्त्वात येतं, हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

शिवाय महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बंडखोरांना जनतेनं नाकारलं असताना आता कर्नाटकची जनता कुणाला कौल देते याचीही उत्कंठा आहे.