What Punishment of Rapists : कोलकातातल्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये (Kolkata Rape and Murder Case) झालेल्या रेप आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. देशभरातील डॉक्टर्स रस्त्यावर उतरले आणि या घटनेचा निषेध केला. ही घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील बदलापुरात (Badlapur Case) एका नराधमाने दोन चिमुकिलींचं शाळेतच लैंगिक शोषण केलं. ही संतापजनक घटना समोर येताच लोकांचा उद्रेक झाला आणि बदलापूरमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं. कोलकाता आणि बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या नराधमांना फाशिची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. आता कोर्टात या आरोपींना कोणती शिक्षा होते, हे लवरकच स्पष्ट होईल.
भारतात बलात्कारातील आरोपीला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावली जाते. पण तुम्हाला माहित आहे का? काही देश असे आहेत जिथे बलात्काऱ्यांना भयानक शिक्षा दिली जाते.
या देशात भयानक शिक्षा
उत्तर कोरिया हा देश कठोर कायद्यांसाठी ओळखला जातो. या देशात बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यास लष्कराकजून आरोपीला थेट गोळी मारली जाते. बलात्कारातील आरोपीला फाशी किंवा जन्मठेप अशा कोणत्याही शिक्षेची तरदूत नाही. सऊदी अरबमध्ये बलात्कारातील आरोपीला याहून भयानक शिक्षा दिली जाते. बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यास दोषीला जनतेसमोर उभं करुन भर चौकात आरोपीचं शिर धडापासून वेगळं करण्याची शिक्षा दिली जाते. तर चीनमध्ये बलात्कारातील काही प्रकरणांमध्ये आरोपीचं गुप्तांग कापण्याचीही शिक्षा देण्यात आली आहे.
या देशात आरोपीला मारले जातात दगड
इराकमधला कायदा तर जनतेच्याच हातात सोपवला जातो. बलात्कारातील आरोपीला जनतेच्या समोर उभं करुन त्याला दगड मारण्याचे आदेश दिले जातात. जोपर्यंत आरोपी मरत नाही तोपर्यंत त्याला दगडाने मारलं जातं.
अमेरिकेत काय आहे शिक्षा?
अमेरिकेच्या कायद्यात बलात्कार किंवा रेप या शब्दांचा वापर केला जात नाही. अमेरिकेत फेडरल लॉ लागू होतं, यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. रशियात बलात्कार प्रकरणातील आरोपीला 30 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
पाकिस्तानात फाशी किंवा जन्मठेप
पाकिस्तानमध्ये बलात्कार हा एक जघन्य अपराध मानला जातो. या देशात बलात्काऱ्याला फाशीची शिक्षा किंवा कठोर कारवासाची शिक्षा सुनवाली जाते. सामुहिक बलात्कारातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. पाकिस्तानच नाही तर अनेक इस्लामीक देशात कठोर शिक्षेची तरतूद आहे.
भारतात काय शिक्षा?
भारतात आयपीसीच्या कलम 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. यात अल्पवयीन मुलीबरोबर लैंगिक अत्याचाराची घटना असेल तर कठोर शिक्षा होते. 16 वर्षांखालील मुलीवर अत्याचार प्रकरणातील दोषी आरोपीला कमीतकमी 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. यात जन्मठेपेची शिक्षाही सुनावली जाऊ शकते.
भारतात पोक्सो कायदा
पोक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंस एक्ट. 2012 हा कायदा अंमलात आला. यात अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार हा गुन्हा ठरतो. हा कायदा 18 वर्षांखालील मुले आणि मुली दोघांनाही लागू होतो. या कायद्याचा उद्देश लहान मुलांना लैंगिक अत्याचार आणि अश्लिलतेपासून वाचवण्याचा आहे. पोक्सोअंदर्गत दोषी आढळणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्याची तरतूद आहे. कमीतकमी दहा वर्ष आणि जास्तीतजास्त जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते.