मुंबई : अंगावर खाज येणे ही खूप सामान्य आहे. तुमच्या अनेकदा लक्षात आले अंगावर खाज आली की आपण लगेच त्वचेवर ओरखडतो. त्यानंतर आपल्याला दिलासा मिळतो. शरीराच्या कोणत्याही भागात खाज येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला खाज येण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
दिवसातून अनेक वेळा खाज येऊ शकते
लिव्हरपूल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर फ्रान्सिस मॅक्लोन यांच्या मते, एका व्यक्तीला दिवसातून 97 वेळा खाज सुटते.
खाज येण्याची कारणे
वनस्पती आणि कीटक मानवी त्वचेवर टॉक्सिन सोडतात. त्याची रिऍक्शन होऊन, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा हिस्टामाइन स्राव करते. त्यानंतर खाज सुटू लागते.
खाज सुटणे
अमेरिकन शास्त्रज्ञ जेआर ट्रेव्हर यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षे खाज येण्याचे कारण शोधण्यात घालवली. त्यांनी आपली त्वचा खरडून त्याचे अवशेष मोठ्या शास्त्रज्ञांना पाठवले होते. त्यावर त्यांनी एक शोधनिबंधही लिहिला.
वॉशिंग्टन विद्यापीठाने शोधनिबंध प्रकाशित केले
1948 मध्ये अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठाने खाज सुटण्यावर एक शोधनिबंध प्रकाशित केला. शोधनिबंधातील माहितीनुसार, जेव्हा व्यक्तीला खाज येते तेव्हा ते त्वचेवर ओरखडतात, त्यानंतरच त्यांना दिलासा मिळतो.
16 व्या शतकातील शोध
खाज येण्यासंदर्भात प्रथम सोळाव्या शतकात लक्षात आले. सॅम्युअल हॅफरफर नावाच्या एका जर्मन वैद्याने ही समस्या जगासमोर आणली. त्यानंतर खाज काय असते हे त्यांनी पहिल्यांदा जगाला सांगितले.