लोकांना बबल रॅप फोडायला का आवडतं? असं करण्यासाठी आपण का उत्सुक होतो?

हा बबल रॅप एक-एक करुन दाबल्यानंतर तो फुटल्यानंतर त्यातुन एक विशिष्ट प्रकारचा आवाज योतो.

Updated: Oct 9, 2021, 06:40 PM IST
लोकांना बबल रॅप फोडायला का आवडतं? असं करण्यासाठी आपण का उत्सुक होतो? title=

मुंबई : माणूस कितीही मोठा झाला तरी, तो लहानपणी केलेल्या खोड्याकधीही विसरत नाही किंवा काही लोकांना लहानपणीच्या गोष्टी अजूनही करायला आवडतात. ज्यात त्यांना आनंद देखील मिळतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बबल रॅप फोडायला आवडते. आपल्या घरी जर एकादी नवीन वस्तु आली की, त्यात बबल रॅप येतं आणी त्याला टाकून न देता आपण ते बबल फोडत बसतो.

हा बबल रॅप एक-एक करुन दाबल्यानंतर तो फुटल्यानंतर त्यातुन एक विशिष्ट प्रकारचा आवाज योतो, तसेच ते दाबण्यात देखील आपल्यापैकी अनेकांना खूप मजा येते. पण तुम्ही असा कधी विचार केला आहे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना बबल रॅप फोडण्यात इतकी मजा का येते?

खरेतर बबल रॅप पाहून आपल्या मनात एक वेगळीच हालचाल सुरू होते आणि आपले हात शिवशिवायला लागतात आणि त्या बबलपैकी एक तरी फुगा आपण पटकन हाताने फोडतो. मॅगझिन डॉट कॉम मधील एका रिपोर्टनुसार, याचे कारण एका संशोधनात आढळून आले आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, जेव्हा स्पॉन्जी प्रकाराची एक छोटीशी गोष्ट आपल्या हातात येते, तेव्हा आपल्या हातात एक विशेष प्रकारचे तरंग तयार होतात जे आपल्याला त्या वस्तुला दाबण्यासाठी भाग पाडतं.

एवढेच नाही, जेव्हा हे बबल आपल्याला तणावातुन मुक्त करण्यासाठी देखील मदत करतात. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा अशा स्पंज वाल्या वस्तु दाबल्याने आपला तणाव दुर होतो, तसेच एका ठिकाणी आपलं लक्ष केंद्रीत केलं जातं.

जेव्हा आपण हे बुडबुडे बबल रॅपमध्ये फोडण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला ते सारखं सारखं करत राहावसं वाटतं. पण ही गोष्ट चांगली आहे कारण असे करताना आपला ताण कमी होतो.

एका अभ्यासात असेही म्हटले गेले आहे की, बबल रॅपमध्ये एक अशी गोष्ट आहे की आपले जे सर्व लक्ष आपल्याकडे खेचून घेतं आणि आपल्याला असे करण्यास भाग देखील पाडतात. तणावपूर्ण परिस्थितीत बुडबुडे फोडल्याने आपला ताण कमी होतो आणि आपल्याला आराम वाटतो.

त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला हा बबल फोडावेसे वाटले तरी, स्वत:ला थांबवू नका आणि तणाव मुक्त राहा.