मुंबई : तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक गाड्या पाहिल्या असतील, ज्यावर वेगवेगळ्या रंगाची नंबर प्लेट असते. ही नंबरप्लेट पिवळी, सफेद, काळी, तसेच हिरव्या रंगाची असते. परंतु अशा वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट का असतात? याचा तुम्ही कधी विचार केलाय? यारंगाचा नक्की अर्थ काय? खरंतर गाडीची नंबर प्लेट त्याच्या नोंदणीच्या आधारे ठरवली जाते. चला यासंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात.
राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या वाहनांवर लाल रंगाची नंबर प्लेट लावली जाते. यामध्ये क्रमांक प्लेट राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ बसवण्यात आले आहे. त्यांच्याकडे नंबर नाहीत, मात्र काही वर्षांपासून अनेक नेत्यांच्या गाड्यांवर नंबर लावण्याचे आदेश आले आहेत. याशिवाय, कार उत्पादक ज्या वाहनांच्या चाचणीसाठी किंवा जाहिरातीसाठी रस्त्यावर उतरतो, त्या वाहनांवर लाल रंगाच्या नंबर प्लेटही लावल्या जातात.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर हिरव्या नंबर प्लेट लावल्या जातात. इलेक्ट्रिक कारमध्ये हिरव्या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगात नंबर लिहिलेले असतात. तर व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांवरील नंबर हे पिवळ्या रंगात लिहिलेले असतात.
तुम्ही अनेक वाहनांमध्ये काळी नंबर प्लेट पाहिली असेल, ही देखील व्यावसायिक वाहने आहेत. ज्या गाड्या भाड्याने दिल्या जातात त्यांना काळी प्लेट असते आणि त्यांचे क्रमांक पिवळ्या रंगात लिहिलेले असतात.
निळ्या रंगाच्या नंबर प्लेट फक्त दूतावासाशी संलग्न असलेल्या वाहनांवर असतात. परदेशी प्रतिनिधी या निळ्या नंबर प्लेट्सच्या कारमध्ये प्रवास करतात आणि परदेशी राजदूत किंवा मुत्सद्दी त्यांच्या गाडीवर ही प्लेट असते.