Ratan Tata Lifestyle: रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय उद्योगपती आहेत. आज देशातील इतके मोठे उद्योगपती असूनही ते अत्यंत सामान्य (Ratan Tata Family) जीवन जगतात. फक्त तेच नाहीत तर त्यांच्या घरातील मंडळीही अत्यंत साधी असून आत्तापर्यंत ते फारसे लाईमलाईटमध्येही आलेले नाहीत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी त्यांचीही वृत्ती आहे त्यामुळेच अनेक जण त्यांचा आदर्श घेतात. रतन टाटा यांचा संपूर्ण परिवार हा प्रसिद्धीपासून दूर आहे. अत्यंत साधं जीवन जगतात. अगदी त्यांच्या आईवडिल, भाऊ-भावंडांपासून (Ratan Tata Lifestyle) सर्वच जण लाईमलाईटपासून दूर आहेत. आज रतन टाटा यांचा टाटा ग्रुप हा आज जगातील सर्वातच महाकाय बिझनेस आहे.
आपण सर्वांनीच अनेकदा ऐकलं असेल की, रतन टाटा यांचा परिवार हा अत्यंत साधी जीवनशैली फॉलो करतो तर ते खरंच आहे. कारण रतन टाटा यांची वेशभूषाही अगदी साधी असते त्यातून त्याचे खाणंपिणंही अगदी तुमच्या आमच्यासारखंच आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की टाटा यांचा परिवार कोणती जीवनशैली फॉलो करतात. (know more information about ratan tatas family memebers who are away from limelight)
नवल टाटा
नवल टाटा हे रतन टाटा यांचे वडील आहेत. त्यांनी दोन लग्न केली आहेत. पहिली पत्नी सोनू टाटा (Ratan Tata Father and Mother) यांच्याशी वेगळं झाल्यानंतर सिमोन टाटा यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केले.
सिमोन टाटा
सिमोन टाटा आजही जिवंत आहेत. त्या एक बिझनेसवूमन आहेत. त्यांच्याबद्दलही अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. 1961 साली त्यांनी लॅक्मे लिमिटेडच्या बोर्डवर आल्या.
नोएल टाटा
नोएल टाटा हे सिमोन टाटा आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत. तेही बिझनेसमन आहेत. सिमोन यांच्या 'ट्रेंट' या कंपनीचे ते चेअरमन आहेत तर टाटा इंटरनॅशनलचे ते मॅनेजिंग डिरेक्टर आहेत.
माया टाटा
माया टाटा ही नोएल टाटा यांची छोटी मुलगी आहे. टाटा डिजिटलमध्ये ती काम करते. सोबतच टाटा ऑपच्युर्निटीज फंडमध्येही ती काम करते.
नेविल टाटा
नेविल टाटा यांनी किर्लोस्कर टेक्नोलॉजीचच्या डायरेक्टर मानसी किर्लोस्कर यांच्याशी विवाह केला आहे. तेही बिझनेसमन आहेत.
जिमी टाटा
रतन टाटा यांचे बंधू जिमी टाटाही प्रसिद्धीपासून दूर आहेत. ते रतन टाटा यांच्यापेक्षा दोन वर्षे लहान आहेत. मध्यंतरी रतन टाटा यांनी त्यांचा लहानपणीचा फोटो शेअर केला होता. त्यांच्या या फोटोला सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स आले होते.