Aadhaar Card वर मिळेल हवा तो फोटो, जाणून घ्या कसं?

जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आधार कार्ड (Aadhaar Card) महत्त्वाचं झालंय.   

Updated: Oct 28, 2022, 10:06 PM IST
Aadhaar Card वर मिळेल हवा तो फोटो, जाणून घ्या कसं? title=

मुंबई :  आधार कार्ड (Aadhaar Card) हल्ली प्रत्येक ठिकाणी बंधनकारक आहे. वैयक्तिक ओळख पटवण्यासाठी आधी आधार कार्डची मागणी केली जाते. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आधार कार्ड महत्त्वाचं झालंय. आधार कार्डच्या मदतीने सरकारी सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र आधार कार्डवर काहींचे फोटो खराब येतात. त्यामुळे काहींना त्याची लाज वाटते. अशावेळेस आधार कार्डावरचा फोटो ऑनलाईन कसा बदलायचा (how to update aadhar card photo) हे आपण जाणून घेणार आहोत. (know how to change your aadhar photo online follow steps)

आधार कार्डावरचा फोटो बदलायचा असेल आणि त्याजागी हवा तो फोटो मिळणार आहे. ही सुविधा ऑनलाईन असणार आहे. आधार एपच्या मदतीने आधार कार्डावरील नाव, मोबाईल नंबर, पत्ता, लिंग, जन्मतारीख आणि फोटो बदलता येतो.

ऑनलाईन पद्धतीने असा बदला फोटो

- आधारवरील फोटो  बदलण्यासाठी आधी UIDAI वेबसाईटवर जा. 

- त्यानंतर आधार सेक्शनमध्ये जाऊन आधार एनरोलमेंट फॉर्म अपडेट डाऊनलोड करा.

- एनरोलमेंट फॉर्ममधील आवश्यक माहिती भरुन सीएसस (CSS) मध्ये जमा करा. 

- सीएससमध्ये बायोमॅट्रिक माहिती घेतली जाईल.

- फोटो बदलण्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील. 

- सर्व औपचारिकता झाल्यानंतर पैसे भरल्याची आणि आधार फोटो अपडेटसाठी प्रोसेस केल्याचा पुरावा म्हणून पावती दिली जाईल. 

- या पावतीत तुमचा फोटो बदलण्याची प्रोसेस कुठवर आलीय हे लिंकद्वारे ट्रॅक करता येईल. 

- यानंतर काही दिवसांनी आधारवरील फोटो अपडेट होईल.