नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकने नवीन FD लॉन्च केली आहे. ग्राहकांना या FDचा दुहेरी फायदा मिळणार आहे. ही FD'FD हेल्थ' या नावाने लॉन्च करण्यात आली आहे. ही FD केल्यानंतर पहिल्या वर्षी मोफत विमा संरक्षण मिळणार आहे. याला रिन्ह्यूही केले जाऊ शकते.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षांसाठी २ ते ३ लाख रुपयांच्या FDवर आयसीआयसीआय लोम्बार्डकडून, गंभीर आजारांवर एक लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. १८ ते ५० वयोगटातील लोक या FDसाठी पात्र असतील.
या 'FD हेल्थ'मध्ये कॅन्सर, फुफ्फसे, किडनी, लिव्हर, ब्रेन ट्यूमर, अल्जायमरसह ३३ गंभीर आजारांचा समावेश आहे. या आजारांच्या इलाजावर १ लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत मिळणार आहे.
Presenting our latest addition to the #ICICIBankFDXtra family, ‘FD health’. The fixed deposit provides customers with benefits of returns & security of fixed deposit and the protection of a health cover for critical illnesses. #ICICIBankFDHealth https://t.co/ojSGnUmMEx
— ICICI Bank (@ICICIBank) October 14, 2019
आतापर्यंत अशाप्रकारच्या दुहेरी फायदा असणाऱ्या FD बाजारात नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे. बँकेकडून ही सुविधा FD एक्स्ट्रा या रकान्यात उपलब्ध आहे.
बँकेचे अधिकारी प्रणव मिश्रा यांनी, शेअर बाजारात सतत चढ-उतार असतो. अशा परिस्थितीत बँक आपल्या ग्राहकांसाठी दुहेरी लाभ असणारी सुरक्षित गुंतवणूक घेऊन आली असल्याचे सांगितले आहे.
'FD हेल्थ' ही पहिलीच अशी सुविधा आहे, जी सुरक्षित गुंतवणूकीसह ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचे प्रणव मिश्रा यांनी सांगितले.
टीप : संबंधित बँकेतून विस्तृत माहिती घेतल्यानंतरच गुंतवणूक करा