Cooking Tips : थंड झाल्यानंतरही चपाती राहील मऊ आणि लुसलुशीत... वापरा 'या' Tips

Kitchen Cooking Tips : चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते. 

Updated: Nov 17, 2022, 03:40 PM IST
Cooking Tips : थंड झाल्यानंतरही चपाती राहील मऊ आणि लुसलुशीत... वापरा 'या' Tips title=

Kitchen Cooking Tips​ : गव्हाची पोळी खाणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. पण त्यातही पोळी करणे हे नवशिक्यांसाठी एक चॅलेंज सारखंच असतं.  (roti making tips) अनेकांच्या पोळ्या काही तासानंतर कडक होतात. यावेळी अनेक गोष्टींना दोष दिला जातो, पण पोळीतला (Wheat Roti) कडकपणा काही करता कमी करता येत नाही. पण काही साध्या पण चमत्कारीक गोष्टी देखील असतात, त्या पाळल्या तर तुमच्या हातची पोळी देखील मऊ लुसलुशीत होवू शकते आणि तासंनतास मऊच राहते. (how to get soft and fresh wheat roti)

चला जाणून घेऊया कशा ठेवाल पोळ्या मऊ आणि लुसलुशीत 

 

1- काही महत्वाच्या आणि बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण उत्तम पोळ्या बनवू शकतो आणि त्या फारवेळ ठेवल्या तरी मऊ आणि लुसलुशीतच राहतील . 
पोळ्या बनवताना पाणी आणि पिठाचं योग्य प्रमाण वापरलं पाहिजे. जर तुम्ही एक वाटी पीठ घेत असाल तर अर्धा वाटी पाण्यात ते पीठ तुम्ही व्यवस्थित मळून घ्यावे. त्याचसोबत पिठात एक चिमूट मीठ घालायला विसरू नका. यामुळे चपातीला चव येते आणि ती मऊ राहते. (Kitchen Hacks how to get soft chapati chapati round chapati tips hacks)

2- पीठ मळण्याआधी ते चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या. यामुळे पीठ सैलसर होऊन चपट्या मऊ होऊ लागतात. 

3- चपाती बनवण्यासाठी पीठ नेहमी मऊसर आणि सैलसर मळावे  असे केल्याने चपाती मऊसर राहते. याउलट पुऱ्या बनवायच्या असतील तर मात्र पीठ थोडं कडक मळावं लागत. 

4- पीठ मळताना सर्वात आधी कोरड्या पिठ घेऊन त्यात  हाताने एक खड्डा करावा त्यात हळूहळू पाणी घालत मग पीठ घालत मळून घ्यावं. लक्षात ठेवा पाणी हळूहळू घाला एकदम पाणी घालू नका. नाहीत पीठ पातळ होईल चपट्या लाटण मुश्किल होऊन बसेल.  

5- चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते. 

6- तव्यावर चपाती टाकल्यावर हे लक्षात ठेवा ती गोळा होता कम नये नाहीतर चपाती कधीच फुगणार नाही. 

7- चपाती नेहमी फास्ट गॅसवरच शिकवावी. मंद आचेवर पोळी भाजली तर ती मऊ होणार नाही. म्हणून चपाती भाजताना गॅस सोयीप्रमाणे फास्ट किंवा स्लो करावा. 

चला तर मग या टिप्स वापरा आणि तुमच्या चपात्या बघा कशा मऊ आणि लुसलुशीत राहतात.  (Kitchen Hacks how to get soft chapati chapati round chapati tips hacks)