Viral: मुलाने भरदिवसा मुलीसोबत केले असे कृत्य, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप; पण...

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आपल्या व्हिडीओचे व्ह्यूज वाढवण्यासाठी विचित्र हरकती करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Jun 20, 2022, 02:10 PM IST
Viral: मुलाने भरदिवसा मुलीसोबत केले असे कृत्य, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप; पण... title=

Social Media Prank: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात एखाद्यासोबत नकळत केलेल्या गंमतीचे व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. यामुळे अनेकदा सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आपल्या व्हिडीओचे व्ह्यूज वाढवण्यासाठी विचित्र हरकती करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांची तळपायाची आग मस्तकात गेल्याचं पाहायला मिळत आहे.  

यूट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगा एस्केलेटरवरून खाली जाताना दिसत आहे आणि एक मुलगी दुसऱ्या बाजूला एस्केलेटरवरून वर जात आहे. मुलगी तिचा फोन वापरण्यात व्यस्त आहे आणि मुलगा त्या मुलीकडे बघत आहे. दोघे जवळ येताच मुलगा त्या मुलीचे चुंबन घेतो. मुलीला अचानक काय झाले हे समजत नाही आणि त्याला पकडण्यासाठी पळू लागते. मुलगाही एस्केलेटरही बदलत पळताना दिसत आहे.

मुलगी एस्केलेटरवरून खाली येत असताना त्या मुलाने तिचा फोन तिच्या हातातून हिसकावून घेतला. त्या मुलीला डोक्यावर हात मारण्यावरून पर्याय उरत नाही. या व्हिडीओमध्ये मुलगा आणि मुलगी नाटक करत असल्याचं कळत आहे. प्रत्यक्षात असे काहीही घडलेलं नाही. या व्हिडीओवर काही लोकं हसतानाचे इमोजी, तर काही लोक संतापताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ  इतरांनाही कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत असे करण्यास प्रेरित करू शकतो. यामुळेच काही लोकांना हा प्रकार आवडला नाही. आत्तापर्यंत 12 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.