लहान मुलांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा, अखेर महत्त्वाची मंजुरी मिळालीच

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सर्वात मोठा निर्णय

Updated: Dec 25, 2021, 09:23 PM IST
लहान मुलांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा, अखेर महत्त्वाची मंजुरी मिळालीच title=

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाची चिंता वाढवली आहे. आता भारतातही ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे. कोरोनाचे वाढता धोका पाहता आता डीसीजीआयने लहान मुलांच्या आपत्कालीन लसीकरणाला मंजुरी दिली आहे. 

तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता DCGI ने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला ही परवानगी मिळाली आहे. 

एका अहवालानुसार SEC ने ऑक्टोबरमध्ये DCGI कडे लहान मुलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोव्हॅक्सीन देण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता ही आनंदाची बातमी म्हणायला हवी. 

भारतात लहान मुलांच्या वापरासाठी मान्यता मिळालेली कोव्हॅक्सीन ही दुसरी लस आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लहान मुलांना कोव्हॅक्सीन देण्यात येईल. त्यासाठी आता DCGI कडून मान्यता मिळाली आहे. 

ऑगस्ट महिन्यात  Zydus Cadila या कंपनीने 12 वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांना 3 लसीचे डोस देण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. त्याला DCGI कडून आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली होती. आता त्यापाठोपाठ कोव्हॅक्सीनलाही परवानगी देण्यात आली आहे.