तिरुवनंतपुरम: आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या बचावकार्यातील एक व्हिडिओ नेव्हीने ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी एका गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या साह्याने वाचवले आहे.
सभोवताली पाण्याचा वेढा पडल्यामुळे ही महिला अडकली होती. सुजीता जबेल असे त्या गर्भवती महिलेचे नाव आहे. बचावकार्यादरम्यान २५ वर्षीय सुजीताच्या पोटाला धक्का लागल्यामुळे गर्भाशयाला दुखापत झाली. त्यावेळी भारतीय नेव्हीने प्रसंगावधान दाखवत त्या महिलेला जवळील संजीवनी रुग्णालयात दाखल केले. वेळीच डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करत ऑपरेशन केले. सध्या बाळ-बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत.
A pregnant lady with water bag leaking has been airlifted and evacuated to Sanjivani. Doctor was lowered to assess the lady. Operation successful #OpMadad #KeralaFloodRelief #KeralaFloods2018 pic.twitter.com/bycGXEBV8q
— SpokespersonNavy (@indiannavy) August 17, 2018
Here they are! Mother & baby doing fine :) Family sends thanks to the @IndianNavy crew. pic.twitter.com/QXsR6A7fK2
— Shiv Aroor (@ShivAroor) August 17, 2018