डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा चार वर्षांच्या मुलीला फटका, करायची होती बोटाची शस्त्रक्रिया झाली...

Kerala News : केरळाच्या सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षांची एक मुलगी आपल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारी रुग्णालयात आलीहोती. पण डॉक्टरने तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया केली.

Updated: May 17, 2024, 07:19 PM IST
डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा चार वर्षांच्या मुलीला फटका, करायची होती बोटाची शस्त्रक्रिया झाली...  title=
संग्रहित फोटो

Kerala News : डॉक्टरला आपण देवाचं दुसरं रुप मानतो. पण काही डॉक्टरांच्या चुकीचा फटका रुग्णाच्या आरोग्याला बसतो. अशीच एक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चार वर्षांच्या चिमुरडीला आयुष्यभराची वेदना सहन करावी लागणार आहे. केरळातल्या एका सरकारी रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. एक चार वर्षांची मुलगी बोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारी रुग्णालयात आली होती. पण डॉक्टरने तिच्या जीभेवर शस्त्रक्रिया केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी डॉक्टरविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीय. या घटनेने एकच खळबळ उडाल्यानंतर त्या डॉक्टरला निलंबित करण्यात आलं. 

काय आहे नेमकी घटना?
चार वर्षांच्या या मुलीच्या एका हाताला सहा बोटं होती. सहावं बोट काढण्यासाठी तिचे आई वडिल केरळातल्या एका सरकारी रुग्णालयात आणलं.  सर्व तपासण्यांनंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ठरलेल्या वेळेत मुलीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. पण शस्त्रक्रियेनंतर ज्यावेळी मुलीला ऑपरेशन थिएटर बाहेर आणण्यात आलं, त्यावेळी तिच्या आई-वडिलांना धक्काच बसला. मुलीच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबवण्यात आला. पालकांनी कापसाचा बोळा हटवल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीच्या हाताचं सहावं बोट तसंच होतं. डॉक्टरने चुकीने तिच्या जिभेची शस्त्रक्रिया केली होती.

याबाबत संतापलेल्या पालकांनी डॉक्टरकडे विचारणा केली. यावेळी डॉक्टरने मुलीच्या तोंडात एक गाठ होती, ती काढणं गरजेचं होतं, त्यामुळे शस्तक्रिया केल्याचं सांगितलं. डॉक्टरचं उत्तर ऐकून पालकांनी रुग्णालयाच्या डीनकडे याची तक्रार केली.

डॉक्टरचा हलगर्जीपणा
ही घटना बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी दोन मुलींच्या शस्त्रक्रिया होणार होत्या. यातल्या एका मुलीच्या जीभेवर शस्तक्रिया करण्यात येणार होती. एका मुलीच्या हाताचं सहावं बोट काढलं जाणार होतं. पण डॉक्टरने हातावर शस्त्रक्रिया होणार असलेल्या मुलीच्या जीभेवर शस्त्रक्रिया केली. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण पसरलं आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चौकशीत डॉक्टरची चुकी आढळल्यानंतर त्या डॉक्टरला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. तसंच सरकारी रुग्णालयाला सर्व नियम पाळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

डॉक्टरविरोधात पोलिसात गुन्हा
मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची पोलिसातही तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे डॉक्टरविरोधात कलम 336 आणि 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोध पक्षांनी या घटनेवर सरकारचा निषेध नोंदवला आहे. 

लड़की के परिवारवालों की शिकायत के बाद डॉक्टर के खिलाफ पुलिस ने आईपीसी की धारा 336 और 337 के तहत केस दर्ज किया है. वहीं विपक्ष के नेता वीडी सतीसन ने इस पूरे घटना की नींदा की है. 

Disclaimer: बातमीमध्ये दिलेली काही माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणतीही सूचना अंमलात आणण्यापूर्वी, आपण संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.