Age is just number! माय-लेकाची प्रेरणादायक कहाणी

शिकायला वयाची मर्यादा नसते, अशीच एक प्रेरणादायी कहाणी सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे. 

Updated: Aug 10, 2022, 04:58 PM IST
Age is just number! माय-लेकाची प्रेरणादायक कहाणी title=
kerala psc success story mother and son passed the psc exam in marathi

Success Story  - प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, असं म्हणतात. पण आता असं म्हणं चुकीचं होईल. कारण Age is just number असं हे या माय-लेकाने करुन दाखवलं आहे. शिकायला वयाची मर्यादा नसते, अशीच एक प्रेरणादायी कहाणी सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे. 

केरळमधील मल्लापूरमधील माय-लेकाने लोकसेवा आयोगाची (पीएससी) परीक्षा पास केली आहे. बिंदू असं या महिलेचं नाव असून त्या 42 वर्षांच्या आहेत. तर त्यांचा 24 वर्षीय मुलगा विवेक हे दोघे आता सरकारी नोकरीत आहेत. 

विवेक दहावीत असताना बिंदू यांनी त्याला अभ्यासात प्रोत्साहित करण्यासाठी पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली. यातून बिंदू यांना लोकसेवा आयोगाच्या (पीएससी) परीक्षेची प्रेरणा मिळाली.  

माय-लेकाची एकत्र अभ्यास

पुढे त्यांनी या परीक्षेच्या तयारीसाठी एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला.  त्यांनी दोनदा एलजीएस आणि एकदा एलडीसीसाठी प्रयत्न केला. चौथांदा त्या यशस्वी झाला. मुलानेही पदवीधर झाल्यानंतर त्यानेही याच कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. 

माय-लेकाने एकत्र लोकसेवा आयोगाच्या (पीएससी) परीक्षा दिली. बिंदू यांनी लास्ट ग्रेड सर्व्हंट' (LDS) परीक्षा पास केली आणि त्यांना 92 वा रँक मिळाली. तर विवेक हा लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) परीक्षा पास झाला असून त्याला 38 रँक मिळला. एलजीएस परीक्षा उत्तीर्ण होणे हा 'बोनस' असल्याचं बिंदू मानतात. बिंदू म्हणतात, आयसीडीएस पर्यवेक्षक परीक्षा हे त्याचं पुढचं ध्येय आहे.  

बिंदू या 10 वर्षांपासून अंगणवाडी शिक्षिका आहेत. त्यांना पीसीएस परीक्षेसाठी मुलगा, मैत्रिणी आणि कोचिंग सेंटरमधील शिक्षक प्रोत्साहन देते होते, असं बिंदू सांगतात. 

आई आणि मी कधी एकत्र अभ्यास केला नाही, पण आम्ही काही विषयांवर चर्चा केली. मला कायम एकट्याने अभ्यास करायला आवडतो. आईला अंगणवाडी आणि घर कामातून वेळ मिळाला की ती अभ्यास करायची, असं विवेक म्हणाला.