केरळात जलप्रलय : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, २.८ लाख लिटर पाणी रवाना

केरळमध्ये पावसाच्या बळींच्या संख्येत वाढ होत आहे.  आतापर्यंत ३२४ जणांचे बळी गेलेत. दरम्यान, केरळ राज्यात जलप्रलयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 17, 2018, 08:36 PM IST
केरळात जलप्रलय : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, २.८ लाख लिटर पाणी रवाना title=
Image Courtesy: Reuters

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या बळींच्या संख्येत वाढ होत आहे.  आतापर्यंत ३२४ जणांचे बळी गेलेत. दरम्यान, केरळ राज्यात जलप्रलयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय. त्यामुळे रेल्वेने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तामिळनाडूतून रेल्वेने २.८ लाख लिटर पाणी केरळकडे रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, हवामान खात्यानं केरळमधील आणखी १५ जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिलाय.

केरळच्या देवभूमीत सध्या मृत्यूचं तांडव सुरु आहे. देवभूमी केरळवर सध्या वरूणराजा कोपलाय. गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं तिथं जलप्रलय आलाय. या पावसानं आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिकांचे बळी घेतलेत. पथनमातित्ता, एर्नाकुलम आणि थरीस्सून जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याची पातळी २० फुटांहून अधिक आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्यात. पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या पाच टीम दाखल झाल्यात. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम बचावकार्य करणाऱ्या पथकानं सुरू केलंय...

केंद्र सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने पूरग्रस्तांसाठी १३०० लाइफ जॅकेट्स, ५७१ लाइफबॉय, १ हजार रेनकोट, १३०० गमबूट, १२०० अन्नपदार्थांची पाकिटं, १५०० खाऊची पाकिटं, २५ मोटारयुक्त बोटी, ९ बिगर मोटारीच्या बोटी पाठवून दिल्यात. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी खास ट्वीट करून केरळवासियांना मदत करण्याचं आवाहन केले आहे. 

गेल्या १०० वर्षांतील भयानक महापुराचा सामना सध्या केरळ करतंय. आतापर्यंत ३२४ जणांचे बळी गेलेत. ८० धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेत. सुमारे सव्वा दोन लाख लोक पुरामुळं बाधित झाले असून, त्यांना १५०० हून अधिक मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आलंय. या भयंकर आपत्तीतून केरळवासियांना वाचवण्यासाठी मदत करा, असं आवाहन विजयन यांनी केले आहे.

एकीकडं पूर परिस्थिती असताना केरळमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवतेय. त्यामुळं तामिळनाडू सरकारनं ३ लाख लीटर पिण्याचं पाणी सिंटेक्स टाक्यांमधून पाठवून दिलंय. त्यातच हवामान खात्यानं केरळमधील आणखी १५ जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिलाय.

केरळात जलप्रलय : १६४ जणांचे बळी, आयएएस अधिकाऱ्यांची अशी माणूसकी!

केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलंय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून आत्तापर्यंत ३२४ जणांचा बळी पावसाने घेतला आहे. हवामान विभागाने राज्यातील १३ ते १४ जिल्हांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पथनमातित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सून जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याची पातळी २० फूटाहून अधिक आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. पावसाचा कहर पाहाता एनडीआरएफच्या पाच टीम दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे.