2020 मध्ये कोणतेही व्यवहार करताना 'ही' काळजी घ्याल

नव्या वर्षात तारीख लिहिताना काळजी घ्याल 

Updated: Dec 31, 2019, 02:25 PM IST
2020 मध्ये कोणतेही व्यवहार करताना 'ही' काळजी घ्याल title=

मुंबई : 2019 हे वर्ष सरायला अवघे काही तास उरले आहे. प्रत्येक जण 2020 या नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. सरत्या वर्षाने दिलेल्या अनुभवासोबत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नवीन वर्ष, नवे संकल्प उद्याच्या सुर्योदयाची वाट पाहत आहेत. 

2020 या नव्या वर्षी अगदी सुरूवातीपासूनच काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहेत. 2019 वर्षात आपल्याला अनेक बँकेच्या किंवा खासगी व्यवहारांमध्ये दिनांक लिहिताना फक्त 19 असा उल्लेख करायचा. यावरून 2019 असं समजलं जात असे. पण हीच गोष्ट आपण 2020 मध्ये करू शकत नाही. कारण 2020 मध्ये फक्त '20' असं लिहिणं चुकीचं ठरू शकतं. यामुळे गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता आहे. (असं असेल 2020 हे वर्ष !) 

 

यामुळे वर्षाच्या अगदी सुरूवातीपासूनच तारीख लिहिताना 1 जानेवारी 2020 अशी लिहीण्याची सवय लावा. जेणे करून अगदी घाईगडबडीत किंवा महत्वाच्या व्यवहारांच्यावेळी याची काळजी घ्याल. 

या ठिकाणी घ्याल काळजी
नोकरदार वर्गाने कामाच्या ठिकाणी लक्ष द्यावे 
व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने कोणतेही व्यवहार करताना काळजी घ्या 
विद्यार्थ्यांनी कोणत्याही महत्वाच्या नोंदी ठेवताना तारीख तपासून पाहाल.
बँकेचे व्यवहार करताना प्रत्येकाने याची काळजी घ्याल.
दिवसाची किंवा कोणत्याही कामाची सुरूवात ही तारीख लिहून करण्याची अनेकांची सवय असेल तर त्यांनी याची खबरदारी घ्यावी.

2019 हे वर्ष अनेकांना भरपूर अनुभव, कडू-गोड आठवणी देऊन जात असेल. तर येणारं वर्ष हे प्रत्येकासाठी निरोगी आयुष्य, सुख, समाधानाचं ठरेल अशा शुभेच्छा आम्ही 24Taas.com कडून देतो.