चारधाम यात्रेला सुरूवात, विधिवत पूजेनंतर आज उघडले केदारनाथाचे दरवाजे

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरु झाली  आहे.   बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचे आज दरवाजे उघडण्यात आले आहेत. . सकाळी सव्वासहाच्या सुमारास हे दरवाजे उघडण्यात आलेत. विधीवत पूजाअर्चा करुन केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आलेत. यावेळी राज्यपाल के. के. प़ॉल आणि हजारो भाविक उपस्थितीत होते. यंदा भक्तांना केदारनाथाचं वेगळं रुप पाहायला मिळालं. सकाळच्या सुमारास खास लेझर शोचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. 

Updated: Apr 29, 2018, 08:50 AM IST
चारधाम यात्रेला सुरूवात, विधिवत पूजेनंतर आज उघडले केदारनाथाचे दरवाजे  title=

उत्तराखंड​ : उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरु झाली  आहे.   बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचे आज दरवाजे उघडण्यात आले आहेत. . सकाळी सव्वासहाच्या सुमारास हे दरवाजे उघडण्यात आलेत. विधीवत पूजाअर्चा करुन केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आलेत. यावेळी राज्यपाल के. के. प़ॉल आणि हजारो भाविक उपस्थितीत होते. यंदा भक्तांना केदारनाथाचं वेगळं रुप पाहायला मिळालं. सकाळच्या सुमारास खास लेझर शोचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. 

 दर्शनाची वेळ काय ?  

 भाविकांसाठी सकाळी सहा वाजल्यापासून दरवाजे खुले करण्यात येतील. 
 
 दुपारी 3-5 वाजेपर्यंत खास पूजा करण्यात येईल. त्यानंतर विश्रांतीसाठी मंदीर  बंद करण्यात येईल. 
 
 संध्याकाळी पुन्हा 5 नंतर मंदीर खुले करण्यात येईल. 
 
 पाचमुखी शिव प्रतिमेला साज श्रृंगार करून पुन्हा 7.30 ते 8.30 या वेळेत आरती होईल. 8.30 वाजता केदारेश्वराचे मंदीर बंद ठेवण्यात येईल. 
 
 दरवाजे बंद झाल्यानंतर केदारनाथाची मूर्ती 'उखीमठा'त ठेवली जाते.

 यंदा सुमारे 5 लाख भाविक केदारनाथाचे दर्शन घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.