मुंबई : डीएमके नेते एम करुणानिधी यांच्या निधनानंतर द्रविडी सत्तेच्या परंपरेनुसार त्यांचाही दफनविधी पार पडणार आहे. याआधीही द्रविड आंदोलनाचे नेते परियार, सीएन अन्नादुराई, एमजी रामचंद्रन आणि जयललिता यांसारख्या नेत्यांना दफन केलं गेलंय.
द्रविडी आंदोलन मुख्यरुपात ब्राह्मण्यवाद आणि हिंदी भाषेच्या विरोधात उभं राहिलं... ब्राह्मण्यवादाच्या विरोधाच्या स्वरुपात द्रविड आंदोलनाच्या नेत्यांनी हिंदू धर्मातील मान्यता धुडकावून लावल्या... त्यामुळे या आंदोलनाचे नेते नास्तिक राहिले... त्यांनी सैद्धांतिक रुपात देव आणि हिंदू धर्माशी निगडीत समान प्रतिकांना मानण्यास नकार दिला. त्याऐवजी त्यांनी निसर्ग आणि मानवतावादावर जोर दिला.
अधिक वाचा - VIDEO : एमजीआर यांच्या अंत्यदर्शनावेळी झाला होता जयललितांचा अपमान
अधिक वाचा - जयललिता यांना अग्नी दिला जाणार नाही, दफन करणार
अधिक वाचा - शशिकलांनी जयललितांच्या समाधीवर मारला तीन वेळा हात
द्रविडी नेत्यांच्या उलट जयललिता या अय्यंगार ब्राह्मण होत्या. त्या कपाळावर नेहमी अय्यंगार नमम (टिळा) लावत होत्या. अय्यंगार ब्राह्मणांमध्ये मृतकाला मुखाग्नि देण्याची परंपरा आहे... परंतु, जयललिता यांना कोणत्याही जाती आणि धार्मिक ओळखीची गरज नाही असं सांगत त्यांचा दफनविधी शासकीय इतमामात पार पाडण्यात आला... त्यांचे मेन्टॉर एमजीआर यांचा दफनविधी जिथे पार पडला तिथेच त्यांचं दफन करण्यात आलं.
परंतु, यामुळे नाराज झालेले जयललिता यांच्या काही नातेवाईकांनी यावर आक्षेप घेतला... आणि त्यानंतर काही दिवसांनी मैसूरच्या उच्च ब्राह्मण कुटुंबातून येणाऱ्या जयललिता यांच्यावर मैसूरहून २५ किलोमीटर अंतरावर श्रीरंगपट्टनममध्ये कावेरी नदीच्या तिरावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी जयललिता यांचं पार्थिव म्हणून 'वाळलेल्या घासा'ला अग्नि देण्यात आला.