कर्नाटक नेतृत्व बदलाची शक्यता, येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळणार?

Updated: Jul 17, 2021, 02:52 PM IST
कर्नाटक नेतृत्व बदलाची शक्यता, येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? title=

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुशळे आता अनेक जण आता मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहेत. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि सूत्रांनी सांगितले की, या बैठकीत येडियुरप्पा यांना आरोग्याचा हवाला देत राजीनामा देण्याची ऑफर करण्यात आली आहे. ते ही ऑफर स्वीकारतात की नाही हे पक्षावर अवलंबून असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जर नेतृत्व बदलण्याचा विचार भाजपने केला असेल तर 26 जुलैपूर्वी नवीन मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतात. 26 जुलै रोजी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री म्हणून 2 वर्षे पूर्ण होतील. येडियुरप्पा यांनी शनिवारी पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांची भेट घेतली.

दिल्लीत येडियुरप्पा यांना हे पद सोडण्याबाबत विचारले गेले असले, तरी ते म्हणाले की, याबाबत प्रश्नच उद्भवत नाही. येडियुरप्पा यांनी शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. नड्डा यांना भेटण्यासंदर्भात विचारले असता येडीयुरप्पा म्हणाले, आम्ही कर्नाटकात पक्षाच्या विकासाबद्दल सविस्तर चर्चा केली. त्यांच्याकडे माझ्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मी काम करेन.

विशेष म्हणजे कर्नाटक भाजपमध्ये काही दिवसांपासून अंतर्गत मतभेद आहेत. अनेक नेत्यांनी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाला उघडपणे आव्हान दिले आहे. परंतु येडियुरप्पा यांनी नेहमीच अशा बंडखोरीला नेहमी शांत करण्यात यश मिळवलं आहे. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर 78 वर्षीय येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्वतंत्र निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की सीएम येडीयुरप्पा यांनी पंतप्रधानांशी बंगळुरू पेरिफेरल रिंग रोड प्रकल्प, मेकड्तू प्रकल्प यासह अनेक विषयांवर चर्चा केली.

येडियुरप्पा शुक्रवारी विशेष विमानाने मुलगा विजयेंद्र यांच्यासह बंगळुरूहून दिल्लीला आले होते. शुक्रवारी, नेतृत्व बदलण्याशी संबंधित प्रश्न त्यांना हसत हसत टाळला. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर ते म्हणाले होते की नेतृत्व बदलण्याच्या चर्चांबाबत काही बोलणार नाही.

मात्र, शनिवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतरही येडियुरप्पा म्हणाले की, कोणीही राजीनामा मागितला नाही. अशी कोणतीही परिस्थिती उद्भवली नाही. पण त्यांनी एक इशारा देत सांगितले की, आम्ही कर्नाटकच्या विकासाशी संबंधित विषयांवर चर्चा केली. त्यांच्याकडे माझ्यासाठी चांगला पर्याय आहे. पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मी काम करेन.'