बंगळुरू : काँग्रेसच्या आरोपानंतर बंगळुरूचे पोलीस आयुक्त हॉटेलमध्ये पोहोचले आहेत, काँग्रेसने केलेल्या आरोपानंतर स्वत: पोलीस आयुक्तांना बंगळुरूच्या एका हॉटेलात जाऊन चौकशी करावी लागली आहे. येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे ३ तास राहिले असताना, बंगळुरूत हे राजकीय नाट्य आणखी रंगात आलं आहे. काँग्रेसने केलेल्या आरोपानुसार, येडियुरप्पा यांच्या मुलाने काँग्रेसच्या २ आमदारांना हॉटेलात डांबून ठेवलं आहे. या काँग्रेसच्या आरोपानंतर गोल्ड फिंच या बंगळुरातील हॉटेलात पोलीस आयुक्त जाऊन पोहोचले आहेत, आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
दरम्यान, काँग्रेसने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. ही क्लिप एका आमदाराशी बोलताना आहे, तसेच यात मंत्री बनवण्याचं आमिष असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच १५ कोटी रूपयांची ऑफर य़ेडियुरप्पांनी या काँग्रेस आमदाराला दिला असल्याचा आरोप देखील काँग्रेसने केला आहे.