बापाचे 32 तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकले; हत्येचं कारण ऐकून पोलिस हादरले

एक तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे 32 तुकडे करुन ते बोअरवेलमध्ये फेकले आहेत. तपासादरम्यान आरोपीने सांगितलेले हत्ये मागचे कारण ऐकून पोलिसही हादरले आहेत. 

Updated: Dec 13, 2022, 06:07 PM IST
बापाचे 32 तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकले; हत्येचं कारण ऐकून पोलिस हादरले title=

Crime News: राजधानी दिल्लीत(Delhi) घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकंडाने(Crime News) संपूर्ण देश हादरला. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर असलेल्या आफताबनेच तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन ते जंगलात फेकले. ही घटना ताजी असतानाच असाच आणखी एक भयंकर प्रकार कर्नाटकात घडला आहे. एक तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे 32 तुकडे करुन ते बोअरवेलमध्ये फेकले आहेत. तपासादरम्यान आरोपीने सांगितलेले हत्ये मागचे कारण ऐकून पोलिसही हादरले आहेत(Crime News). 

कर्नाटक मधील बागलकोट येथे घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी हा 20 वर्षाचा तरुण आहे. त्याने आपल्या पित्याचीच हत्या केली आहे. आरोपीच्या भावाने वडिल बेपत्ता झाल्याची तक्रार केली. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

आरोपी हा वडिलांसब राहत होता. तर, त्याचा मोठा भाऊ पत्नी आणि मुलांसह वेगळा राहत होता. मृत व्यक्तीला दारुचे व्यसन होते. यामुळे मोठा भाऊ वेगळा राहत असला तरी लहान भावाकडे वडिलांची चौकशी करत असे. मात्र, वडिल बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्याने त्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी तपासादरम्यान यांच्या शेतातील बोअरवेलमधून पोलिसांना मृतदेहाचे तुकडे आढळून आले. अधिक तपास केला असता आरोपीने हत्येची कबुली दिली. बोअरवेलमधुल पोलिसांनी मृतदेहाचे तब्बल 32 बाहेर काढले. 

वडिल दारुच्या आहारी गेले होते. रोज दारु पिऊन ते भांडण करत शिवीगाळ करत असे. 6 डिसेंबर पूर्वी देखील वडिलांनी दारुच्या नशेत भांडण करत शिवीगाळ केल्याने तरुणाच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरात त्याने लोखंडी रॉडने वडिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू. यानंतर आरोपी भयभित झाला. या सगळ्यातून वाचण्यासाठी त्याने मृतदेहाचा व्हिलेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

त्याने वडिलांच्या मृतदेहाचे   32 तुकडे करुन ते शेतात असलेल्या बोअरवेलमध्ये फेकले.  मोठ्या भावाने चौकशी केली असता वडिल अनेक दिवसांपासून घरीच आले नसल्याचे त्याने सांगितले. मात्र, वडिलांचा शोध घेण्यासाठी मोठ्या भावाने पोलिस तक्रार केली असता लहान भावाने वडिलांची हत्या केल्याचे त्याला समजले. या घटनेमुळे गावात दहशत पसरली आहे.