बंगळुरु : एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात आज कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार स्थापन झालं. कुमारस्वामी यांनी राज्याच्या 26व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ ग्रहण कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार असल्याचं वक्तव्य कुमारस्वामी यांनी केलं आहे. निवडणुकीपूर्वी जे निर्णय घेतले आणि ज्या घोषणा केल्या आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे कुमारस्वामी म्हणालेत.
I am going to waive-off farmers' loans: Karnataka Chief Minister HD Kumaraswamy in Bengaluru pic.twitter.com/pkVo9mKICs
— ANI (@ANI) May 23, 2018
कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. निवडणुकी जी आश्वासने जनतेला दिलेली आहेत. ती पूर्ण करण्यावर आमचा भर असेल. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत. ते सोडविण्यावर भर राहिल. शेतकरी हिताचे निर्णय आणि त्यांची सुरक्षा घेण्यावर आमची सर्वोच्च प्राथमिकता असेल, असे कुमारस्वामी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
याआधी भाजपच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्यास सुरुवात केली होती. पण एक दिवसाआधीच मुख्यमंत्री झालेले असतांना आणि बहुमत सिद्ध केलेलं नसल्याने असं करण्यापासून त्यांना अधिकाऱ्यांनी रोखलं होतं. त्यानंतर 2 दिवसातच त्यांना सुप्रीम कोर्टाने बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले होते. पण बहुमत सिद्ध करता न आल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.