Karnataka Assembly Election Opinion Poll: महाराष्ट्राच्या शेजरील राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकींची घोषणा झाली आहे. राज्यामध्ये 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर Zee News आणि Matrize ने संयुक्तरित्या केलेल्या ओपिनियन पोलमधून आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे. या सर्वेक्षणामध्ये एकूण 56 हजार जणांनी आपली मतं नोंदवली असून हे सर्वेक्षण 3 मार्च ते 28 मार्च दरम्यान घेण्यात आलं. यामधील अंतिम आकडेवारीमध्ये 3 टक्क्यांपर्यंत फेरफार असू शकते.
निवडणुकीपूर्वी जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी करण्यात येणारं सर्वेक्षण म्हणजे ओपिनियन पोलं. नावाप्रमाणेच या सर्वेक्षणामध्ये केवळ लोकांच्या मतांचा (ओपिनियन्सचा) समावेश असतो. निवडणुकीमध्ये मतदान करताना याच विचारसणीने मतदान केलं जातं असं नाही. ओपिनियन पोल हे मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकणारे किंवा तसा कोणताही प्रयत्न करत नाहीत. आजच कर्नाटकमधील निवडणुकांची घोषणा झाली असून बरोबर 42 दिवसांनंतर मतदान आणि दीड महिन्यांनी म्हणजेच 45 दिवसांनी नवीन सरकार कोणाचं स्थापन होईल यासंदर्भातील चित्र स्पष्ट करणारा निकाल लागेल. मात्र झी न्यूजच्या ओपिनियन पोलमध्ये कर्नाटकमध्ये कोणाचं सरकार येईल यासंदर्भातील संकेत मिळत आहेत.
ओपिनियन पोलमध्ये पंतप्रधान मोदींसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. पंतप्रधान मोदी कर्नाटक निवडणुकीमधील गेम चेंजर व्यक्ती ठरतील असं वाटतं का? असा पहिलाच प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना 56 हजारांपैकी 31 टक्के लोकांनी मोदी गेम चेंजर ठरतील असं मत व्यक्त केलं. तर 32 टक्के लोकांनी मोदी गेम चेंजर ठरतील असं वाटत नसल्याचं म्हटलं. याशिवाय 37 टक्के लोकांनी मोदी गेम चेंजर ठरतील याबद्दल तत्वत: समहमती दर्शवली.
पुढल्या प्रश्नामध्ये केंद्र सरकारच्या कामाकाजासंदर्भातील लोकांचं मत जाणून घेण्यात आलं. केंद्राच्या कामावर समाधानी आहात का? असं लोकांना विचारलं गेलं.
यावर उत्तर देताना 37 टक्के लोकांनी संतुष्ट असल्याचं तर 40 टक्के लोकांनी थोडेसे संतुष्ट असल्याचं म्हटलं आहे. 23 टक्के लोकांनी आपण केंद्राच्या कामावर पूर्णपणे असंतुष्ट असल्याचं सांगितलं.
मोदींच्या कामावर किती संतुष्ट आहात असा तिसरा प्रश्न या सर्वेक्षणामध्ये होता.
या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या 38 टक्के लोकांनी मोदींच्या कामाने आपण संतुष्ट असल्याचं सांगितलं. तर 21 टक्के लोकांनी मोदींच्या कमावर संतुष्ट नसल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे 41 टक्के लोकांनी मोदींच्या कामावर काही प्रमाणात संतुष्ट आहोत असं सांगितलं.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होईल का? असा प्रश्नही या सर्वेक्षणात विचारण्यात आला.
भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होईल असं मत व्यक्त करणाऱ्यांची टक्केवारी 22 इतकी होती. तर या यात्रेचा थोडाचा फायदा काँग्रेसला होईल असं म्हणणारे 37 टक्के लोक आहेत. तर या यात्रेचा काँग्रेसला काहीच फायदा होणार नाही असं 41 टक्के लोकांनी सांगितलं.
भाजपाने 2021 मध्ये येदियुरप्पा यांना हटवून बसवराज बोम्मई यांना कर्नाटकचं मुख्यमंत्री बनवलं. हा बदल भाजपाला फायद्याचा ठरेल असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाला 31 टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिलं. भाजपाला याचा फायदा होईल असं या लोकांचं म्हणणं होतं. तर याचा फारसा फायदा होणार नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 48 टक्के इतकं होतं. तर या मुख्यमंत्री बदलाचा फारसा फायदा होणार नाही असं 48 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर 21 टक्के लोकांनी याचा अजिबात फायदा होणार नाही असं म्हटलंय.
नोकऱ्या आणि शिक्षणामधील आरक्षणासंदर्भात बोम्मई सरकारने काही दिवसांपूर्वी महत्त्वाचे बदल केले. ओबीसी मुस्लिमांसाठी 4 टक्के आरक्षण संपवून ते वोक्कालिगा आणि लिंगायत सामाजामध्ये वाटून देण्यात आलं. यासंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला. आरक्षणामध्ये बदल केल्याने भाजपाला फायदा होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना 34 टक्के लोकांनी याचा फायदा होईल असं सांगितलं. तर 43 टक्के लोकांनी थोडाच फायदा होईल असं सांगितलं. त्याचप्रमाणे 23 टक्के लोकांनी आरक्षणात बदल केल्याने भाजपाचं नुकसान होईल असं मत मांडलं.
मुख्यमंत्री म्हणून कोणाचा कार्यकाळ चांगला होता असंही या सर्वेक्षणात विचारण्यात आलं.
23 टक्के लोकांनी सिद्धरमैय्या आणि 23 टक्के लोकांनी बी. एस. येदियुरप्पा यांचं नाव घेतलं. बोम्मई यांच्या कार्यकाळात चांगलं काम झाल्याचं केवळ 17 टक्के लोक म्हणाले. 14 टक्के लोकांनी एच.डी. कुमारस्वामी यांचं नाव घेतलं तर 23 टक्के लोकांनी अन्य असं उत्तर दिलं.
बसवराज बोम्मईंच्या कामासंदर्भात विचारण्यात आलं असता 32 टक्के लोकांनी आपण त्यांच्या कामाने संतुष्ट असल्याचं सांगितलं. 41 टक्के लोकांनी थोडेच संतुष्ट असल्याचं नमूद केलं. तर 27 टक्के लोकांनी बोम्मई यांच्या कामावर अजिबात समाधानी नसल्याचं म्हटलं.
कर्नाटकमध्ये कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील असं विचारलं गेलं. या प्रश्नाला उत्तर देताना टक्केवारीनुसार कोणत्या पक्षाच्या बाजूने कल दिसून आला पाहूयात...
भाजपा - 38.3%
कांग्रेस - 40.4%
जेडीएस - 16.4%
अन्य - 4.9%
ओपिनियन पोलनुसार कोणाला किती जागा मिळणार?
भाजपाला 96 ते 106 जागा मिळतील असा अंदाज
कांग्रेसला 88 ते 98 जागा मिळण्याची शक्यता
जेडीएसला 23 ते 33 जागा मिळतील अशी शक्यता
अन्य पक्षांना 02 ते 07 जागा मिळतील असा अंदाज