'हनुमानाचा जन्म कर्नाटकात झाला' योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नाशिकच्या साधुमहंतांच्या तीव्र प्रतिक्रिया

Karnatak Election 2023: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारात सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेश आणि कर्नाटकचं अतुट नातं असल्याचं सांगितलं.

Updated: Apr 26, 2023, 09:52 PM IST
'हनुमानाचा जन्म कर्नाटकात झाला' योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नाशिकच्या साधुमहंतांच्या तीव्र प्रतिक्रिया title=

Karnatak Election 2023: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. 10 मे रोजी मतदान होणार असून सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांची कर्नाटकात रिघ लागली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) भाजपचे (BJP) कर्नाटकमधले स्टार प्रचारक आहे. बुधावारी त्यांनी कर्नाटकमधल्या मांड्या इथं प्रचार सभेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि कर्नाटकचं जुनं नातं सांगितलं. 

कर्नाटक आणि उत्तरप्रदेशचं त्रेतायुगाचं नातं आहे. भगवान श्रीरामाचा जन्म उत्तरप्रदेशात झाला तर रामाला प्रिय असलेल्या हनुमानचा जन्म कर्नाटकात झाला. म्हणूनच आपलं नातं भगवान राम आणि हनुमानाइतकंच घट्ट आहे. मांड्याचा हाच गौरव आपल्या पुर्नप्रस्थापित करायचा आहे. उत्तरप्रदेशमध्ये रामाचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. 2024 मध्ये या भव्य मंदिराचं उद्घाटन होणार आहे. रामाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी त्यांचं भव्यदिव्य मंदिर उभं राहात आहे. मी तुम्हा सर्व हनुमानभक्तांना आमंत्रित करण्यासाठी आलोय असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

काँग्रेसवर साधला निशाणा
आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. काँग्रेस ज्या योजनांची घोषणा करतात त्या योजना कार्यकाळ पूर्ण होत आल्यानंतरही सुरुवात होत नाहीत. काँग्रेसला फक्त सत्ता उपभोगायची आहे, पण विकास करायचा नाही, असा टोला आदित्यनाथ यांनी लगावला आहे. 

पीएण मोदींचं कौतुक
आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाची तोंडभरून स्तुती केली. पंतप्रधान ज्या कामाचं भूमीपूजन करतात त्या कामाचे ते लोकार्पणही करतात. देशातील शेतकऱ्यांना पीएम मोदींनी जो सन्मान दिला आहे, आजपर्यंत त्यांना असा कधीही मिळाला नव्हता. सुरक्षा आणि समृद्धीची गॅरंटी आहे. भाजप टीम इंडियासारखं काम करते आणि पीएम आमचे कॅप्टन आहेत. आता कर्नाटकात भाजपला जिंकून देत टीम इंडिया आणखी मजबूत करा असं आवाहन योगींनी कर्नाटकातल्या नागरिकांना केलं.

नाशिकच्या साधुसंतांची तीव्र प्रतिक्रिया
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रातून उद्योगांपाठोपाठ धार्मिक स्थळे देखील राज्याबाहेर नेण्याचे षढयंत्र असल्याचा आरोप महंत सुधीर दास महाराज यांनी केला