नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झालाय. एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोडून काढत भाजपनं कर्नाटकातदेखील एकहाती सत्ता मिळवण्याकडे वाटचाल केलीय. नरेंद्र मोदींच्या करिश्म्यामुळेच काँग्रेसचा आणखी एक गड आपल्या ताब्यात घेण्याची संधी भाजपला मिळालीय, असं म्हटलं जातंय. हे सर्व नरेंद्र मोदी यांच्या प्रचारातील शेवटच्या १० दिवसांमुळे शक्य झालंय, असंही म्हणता येईल.
- १ ते १० मे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कर्नाटकात तब्बल २१ रॅली आयोजित करण्यात आल्या
- उल्लेखनीय म्हणजे, कर्नाटकात नरेंद्र मोदींच्या केवळ १५ रॅली आयोजित करण्यात आल्या... ऐनवेळी त्यात बदल करत मोदींनी तब्बल २१ रॅलींमध्ये सहभाग नोंदवला
- शेवटच्या दहा दिवसांत नव्या मुद्द्यांनी भाजपनं काँग्रेसला घेरलं
- दहा दिवसांआधी भाजपला ८० ते ८५ जागांचा अंदाज होता
- नरेंद्र मोदींच्या मेगा प्रचारामुळे भाजपला २० ते २५ जागांचा फायदा मिळाला
कर्नाटकच्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसकडे केवळ तीन राज्य उरलीत. कर्नाटक हे काँग्रेसनं हातातून गमावलेलं १२ वं राज्य ठरलंय. म्हणजेच भाजप मॅजिक फिगर गाठण्यात यशस्वी ठरलंय. कर्नाटकच्या सर्व म्हणजेच २२२ जागांचा कल हाती आलाय. भाजपला ११४ जागांवर आघाडी मिळालीय. त्यामुळे आता, कर्नाटकात भाजप आपल्या बळावर सरकार स्थापन करणार असल्याचं चित्रं उघड झालंय. उल्लेखनीय म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंजाब सोडून जेवढ्या राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्यात तिथं काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलाय.... तर काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर कर्नाटकातला पराभव हा राहुल गांधी यांचा पहिलाच पराभव ठरलाय.
काँग्रेसचे कर्नाटकाचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांचा चामुंडेश्वरी विधानसभा मतदार संघात पराभव झाला आहे. सिद्धरामैय्या चामुंडेश्वरी आणि बदामी या २ मतदार संघातून निवडणूक लढवत होते, त्यापैकी चांमुंडेश्वरीत सिद्धरामैय्या यांचा पराभव झाला आहे. तर बादामीत देखील सिद्धरामैय्या पराभवाच्या छायेत आहेत. बादामी मतदार संघात सिद्धरामैय्या यांच्या जिंकण्याच्या अपेक्षाही दुसरीकडे व्यक्त केल्या जात आहेत. ( लाईव्ह अपडेटसाठी क्लिक करा http://zeenews.india.com/marathi/live ) जर कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले असते, तर सिद्धरामैय्या हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र त्यांचाच एक नाही तर दोन विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्याने, कर्नाटकातील काँग्रेसच्या पराभवापेक्षा ही बाब मोठी असल्याचं सांगण्यात येत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरु असून भाजप बहुमताकडे वाटचाल करतेय. एकीकडे भाजपच्या पारड्यात मोठ्या संख्येने मते पडतातयत मात्र दुसरीकडे काँग्रेस मोठ्या संख्येने पिछाडीवर आहे. निवडणुकीचे निकाल येणे सुरु होताच सोशल मीडियावरही काँग्रेसला ट्रोल करण्यास सुरुवात झालीये. सुरुवातीला काँग्रेस- भाजप यांच्यात जोरदार काँटे की टक्कर होती. मात्र त्यानंतर हळूहळू काँग्रेस पिछाडीवर जाण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अनेक युझर्सनी काँग्रेसवर जोरदार टीका करण्यास सुरवात केली.