नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेल्या 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला. आता त्यांच्या प्रकृती विषयी माहिती समोर येत आहे. कांता प्रसाद यांची प्रकृती अद्याप नाजूक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत.
पुलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांता प्रसाद यांनी गुरूवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. पण प्रसाद यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं असावं, याचं कारण कळू शकलेलं नाही. कांता प्रसाद यांना दिल्लीमधील सफदरगंज रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कांता प्रसाद यांनी आत्महत्या केल्याची माहिती स्थानिक पोलिसांना गुरूवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मिळाली.
बातमी :http://'Baba Ka Dhaba' च्या कांता प्रसादांनी का केला आत्महत्येचा प्रयत्न, कारण आलं समोर
पोलीस रूग्णालयात पोहोचल्यानंतर कांता प्रसाद यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या असल्याचं समजलं. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठा मुलगा अजय यांना कांता प्रसाद बेशुद्ध अवस्थेत आढळले, त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.