मतदानाआधीच सपाचे नेते नजरकैदेत, निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

 सपाच्या स्थानिक नेत्यांना त्यांच्या राहत्या घरीच नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

Updated: Apr 29, 2019, 11:47 AM IST
मतदानाआधीच सपाचे नेते नजरकैदेत, निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार  title=

कन्नौज : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान देशभरात सुरू आहे. समाजवादी पार्टीचा गड मानल्या जाणाऱ्या कनौजमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. निवडणुकीत गडबड टाळण्यासाठी समाजवादी पार्टीच्या अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यासंदर्भातील तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे सपातर्फे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी रविवारी संध्याकाळीच समाजवादी पार्टीच्या स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवले. भाजपा मतदान गडबड करण्याच्या तयारीत आहेत. सपाचे कार्यकर्ते त्यांना असे करण्यापासून रोखू नयेत म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप सपाने के्ला आहे. सपाच्या स्थानिक नेत्यांना त्यांच्या राहत्या घरीच नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

ईव्हीएम खराब 

 कनौज लोकसभा क्षेत्रात छिबरामऊमध्ये बूथ क्रमांक 160, 161 वर मतदान उशीरा सुरू झाले. ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा वेळ लागला. उत्तर प्रदेशच्या ज्या 13 जागांवर मतदान होतंय तिथे भाजपा आणि सपा-बसपा यांच्यात थेट टक्कर आहे. कनौजची जागा ही सपासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव याच जागेतून उमेदवार आहेत.