कंगना ज्या विमानाने मुंबईला आली, त्यावेळी असे काय घडले? DGCA ने IndiGo कडे मागविला अहवाल

 कंगनाच्या विमान प्रवासाच्यावेळी असं काय घडलं की, आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाइन्सकडून याबाबत अहवाल मागविला आहे. 

Updated: Sep 11, 2020, 06:30 PM IST
कंगना ज्या विमानाने मुंबईला आली, त्यावेळी असे काय घडले? DGCA ने IndiGo कडे मागविला अहवाल  title=

मुंबई : कंगनाच्या विमान (Kangana Ranaut's flight) प्रवासाच्यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नसल्याचे पुढे आले आहे. काही व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत आहेत. आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने Directorate General of Civil Aviation (डीजीसीए) इंडिगो एअरलाइन्सकडून याबाबत अहवाल मागविला आहे. 

९ सप्टेंबरला अभिनेत्री कंगना रनौत चंडीगडहून मुंबईत इंडिगोच्या विमानातून आली. यादरम्यान, उड्डाणादरम्यान व्हिडीओग्राफी आणि छायाचित्रण केले गेल्याचे पुढे आले आहे. आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडो एअरलाइन्सकडून याबाबत अहवाल मागविला आहे. विमानात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग नियमाचे उल्लंघनाबाबतही अहवाल मागविण्यात आला आहे.

डीजीसीएमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही असे काही व्हिडिओ पाहिले आहेत ज्यात मीडियाचे कर्मचारी 6E264 विमानात बुधवारी एकमेकांच्या अगदी जवळ होते. हे सुरक्षा आणि सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. आम्ही 'इंडिगो' या विमान कंपनीला या घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे."

डीजीसीएमच्या दुसर्‍या अधिकाऱ्यानेही या घटनेसंदर्भात एअरलाइन्स कंपनीकडून अहवाल मागविला गेला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी चंदीगड-मुंबई उड्डाण दरम्यान कंगना रनौत पुढच्या रांगेत बसली होती. त्यावेळी अनेक मीडियाचे लोक विमानात होते.

नागरी विमान मंत्रालयाने २५ मे २०२० रोजी सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी नियम जारी केला. त्यात म्हटले आहे, "गंतव्यस्थानावर आल्यानंतर प्रवाशाला जाण्यासाठी (विमानाने) क्रमानुसार परवानगी देण्यात यावी जेणेकरून जास्त लोक कुठेही एकत्र जमू नयेत."