नवी दिल्ली : न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी आज देशाचे ४६ सरन्यायधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात सकाळी पावणे अकराच्या सुमारास कार्यक्रमाला सुरूवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती गोगोईंना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील. १ ऑक्टोबरला न्यायमूर्ती दीपक मिश्रा निवृत्त झाले आहेत. त्याआधी त्यांनी गोगोईंच्या नावाची शिफारस केल्यावर केंद्र सरकारनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. काल गांधी जयंतीची सुटी असल्यानं गोगोई आज आपला पदभार स्वीकारात आहेत.
Justice #RanjanGogoi takes oath as the Chief Justice of India (#CJI) at Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/L018VTVQHd
— DNA (@dna) October 3, 2018