नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी शाम्पूवर देशभरात बंदी आणली आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने याबाबत निर्देश दिले आहेत. कंपनीच्या उत्पादनांचे नमुना चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यात गुणवत्ता नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आंध्रप्रदेश, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश, आसाम या राज्यातून नमुने गोळा करण्यात आले होते. दुकानांमधून आणि गोदामामधून पावडर आणि शाम्पूचा साठा हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याआधी देखील जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रोडक्टवर अनेक आरोप झाले आहेत. परदेशात अनेक ठिकाणी यावर कारवाई देखील झाली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रोडक्टमध्ये कँसरयुक्त पदार्थ असल्याचे आरोप होत आले आहेत. कंपनीच्या प्रोडक्टमध्ये एस्बेस्टस असतं ज्यामळे कँसर सारखा आजार होऊ शकतो अशी तक्रार अनेकदा देण्यात आली आहे.