BESCOM Recruitment 2022: विद्युत विभागात 400 पदांसाठी भरती, अर्ज करण्याची ही शेवटची तारीख

BESCOM Apprentice Recruitment 2022: BESCOM मध्ये एकूण 400 पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 325 रिक्त पदे पदवीधर शिकाऊ आणि 75 तांत्रिक (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवारांसाठी आहेत. यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे आहे.

Updated: Oct 18, 2022, 02:46 PM IST
BESCOM Recruitment 2022: विद्युत  विभागात 400 पदांसाठी भरती, अर्ज करण्याची ही शेवटची तारीख  title=

Jobs in Electricity Department: बंगलोर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेडने विविध शिकाऊ पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार या पदासाठी अधिकृत वेबसाइट  mhrdnats.gov.in वर 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करु शकतात. निवडलेल्या उमेदवारांची यादी 14 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर (AM ते 4.00 PM) दरम्यान केली जाणार आहे.

एकूण 400 पदे भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 325 पदे पदवीधर शिकाऊ आणि 75 तांत्रिक (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवारांसाठी आहेत.  यापदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता :  उमेदवार  हा BE/B.Tech पदवी/ डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा तात्पुरती BE/B.Tech पदवी/ डिप्लोमा प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज कसा कराल

- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट mhrdnats.gov.in वर जावे लागेल.

- या संकेत स्थळावर स्वतःची नोंदणी करा आणि पोर्टलवर लॉग इन करा.

- अर्ज भरा आणि बायोडाटा अपलोड करा.

- आस्थापनाचे नाव निवडा आणि Bangalore Electricity Supply Company Limited शोधा.

- आता अल्पायवर क्लिक करा आणि तात्काळ अप्लाय करु शकता

SC/ST/OBC आरक्षणाबाबत शिकाऊ कायद्यांतर्गत मार्गदर्शक नियम आणि अटींची पालन केले जाईल. अर्जाच्या सुरुवातीच्या ऑनलाइन सबमिशन दरम्यान दावा केलेल्या श्रेणी/आरक्षणाचाच विचार केला जाईल. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी दावा केलेल्या श्रेणी आरक्षणाच्या समर्थनार्थ संबंधित प्रमाणपत्रे सादर करावी लागतील, असे न झाल्यास त्यांचा आरक्षणाचा दावा फक्त सामान्य श्रेणी म्हणून गणला जाईल. जर उमेदवार ओबीसी प्रवर्गासाठी दावा करत असतील, तर त्यांना केंद्र सरकारच्या आदेशानुसार प्रमाणपत्र जारी करणार्‍या प्राधिकरणाच्या तहसीलदार कार्यालयाकडून विहित (ओबीसी) स्वरूपाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.