कोच्ची : केरळमध्ये गेल्या वर्षी ३० वर्षीय दलित लॉच्या विद्यार्थिनीचा बलात्कार आणि हत्या झाली होती.
या प्रकरणावर आज सुनावणी झाली असून त्या दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एर्नाकुलमच्या प्रधान सत्र न्यायालयात न्यायाधीश एन अनिल कुमार यांनी अमीरूल इस्लाम या दोषीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. इस्लाम हा मुळतः आसामचा राहणारा असून मजूरीच्या कामाकरता तो केरळमध्ये आला होता.
इस्लामला भारतीय दंडांतर्गत ३७६ ए या नियमानुसार दोषी ठरवण्यात आले असून बलात्कार आणि हत्या प्रकरणात त्याला दोषी ठरवून बुधवारी शिक्षा सुनावण्यात आला आहे. या प्रकरणावरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे की न्यायालयात उशिरा का होईना पण न्याय आहे.
अशा शिक्षांमुळे घाणेरड्या वृत्तीच्या लोकांना नक्की चाप बसेल असा विश्वास या प्रकरणानंतर बोलला जात आहे.