DJ च्या तालावर मेहुणीसोबत नाचणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक, यामागील कारण धक्कादायक

अहवालानुसार, एका व्यक्तीने डीजेवर डान्स करण्यासाठी आपल्या मेहुणीला जबरदस्ती केली.

Updated: Jun 15, 2022, 09:32 PM IST
DJ च्या तालावर मेहुणीसोबत नाचणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक, यामागील कारण धक्कादायक title=

मुंबई : एका लग्नात एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. ज्यामध्ये आपल्या मेहूणीसोबत डीजेवर नाचणं एका व्यक्तीला महागात पडलं आहे. ज्यामुळे त्याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. हे प्रकरण ऐकून लोकांना आश्चर्य वाटले आहे आणि नक्की त्यांच्यामध्ये असं काय झालं असावं हे जाणून घेण्यासाठी बऱ्यात लोकांचे कान टवकारले आहेत. आपल्याकडे काहीही कार्यक्रम असले की, डीजे लावणं ही जणू काही एक परंपराच झाली आहे. अशावेळी लोक आपल्या मित्र किंवा कुटुंबातील लोकांसोबत डान्स करताता आणि वेळ घालवतात. परंतु एका लग्नाच्या कार्यक्रमात भलताच प्रकार घडला आहे.

अहवालानुसार, एका व्यक्तीने डीजेवर डान्स करण्यासाठी आपल्या मेहुणीला जबरदस्ती केली. खरंतर हा व्यक्ती नशेमध्ये इतका बुडाला होता की, त्याला काय चांगलं आणि काय वाईट हे देखील कळत नव्हते. ज्यामुळे मेहूणी सारखं नाही बोलून देखील हा व्यक्ती तिला आपल्यासोबत नाचण्यासाठी खेचत होता आणि जबरदस्ती करत होता. ज्यामुळे पोलिसांना घटनास्थळी बोलवलं गेलं.

मेहुण्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या व्यक्तीला रात्री पोलीस ठाण्यात नेले आणि रात्रभर लॉकअपमध्ये ठेवले. दुपारपर्यंत कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले आणि परस्पर सामंजस्याने त्याव्यक्तीची सुटका करण्यात आली

वास्तविक, गावातील रहिवासी असलेला जगरूप हा गुडगावमध्ये गार्ड म्हणून काम करतो. त्याचा लहान भाऊ जगदीशचा बांदा येथे १० जून रोजी विवाह झाला होता. जगरूपची मेहुणी देखील या लग्नाला आली होती.

मंगळवारी सायंकाळी वाढाई पूजनाचा कार्यक्रम सुरू होता. घरात सर्वजण डीजेवर नाचत होते. जगरूपही नाचत होता. त्याचवेळी त्याने आपल्या मेहुणीसोबत हे कृत्य केलं होतं.