Video: बायकोसमोरच भर मंडपात मेव्हणीकडे मागितली KISS, वऱ्हाडी मंडळी झाली आवाक्

Jija Saali Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये वधू आणि वर लग्नाच्या मंडपात बसलेले असून नवरदेवाकडे नाव घेण्याचा आग्रह केला जातो. नवरदेव अशा पद्धतीने नाव घेतो की, उपस्थित मंडळी आश्चर्यचकीत होऊन जाते.

Updated: Nov 21, 2022, 01:53 PM IST
Video: बायकोसमोरच भर मंडपात मेव्हणीकडे मागितली KISS, वऱ्हाडी मंडळी झाली आवाक्  title=

Bride Groom Viral Video: भारतात लग्न म्हणजे एक सोहळा असतो. या लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होत असतात. लग्नातील मजेशीर प्रसंग पाहून अनेकदा हसू आवरत नाही. लग्नात नवरदेवाचे बूट लपवणे, तसेच नाव घेण्याचा आग्रह केला जातो. आता तर स्मार्टफोनचं युग आहे आणि प्रत्येकाच्या हाती मोबाईल पाहायला मिळतो. त्यामुळे आनंदाचा क्षण व्हिडीओ (Wedding Video) रुपाने कॅप्चर होतो. एकदा का सोशल मीडियावर टाकला की, वाऱ्यासारखा व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता मेव्हणी नवरदेवाला नाव घेण्याचा आग्रह करते. यावेळी नवरदेव जे नाव घेतो ते ऐकून वऱ्हाडी मंडळी आवाक् होते. तसेच मंडपात एकच हशा पिकतो. वधुलाही हसू आवरत नाही. 

नवरदेवानं घेतलं असं नाव की...!

मेव्हणी आणि वऱ्हाडी मंडळींचा आग्रह पाहून नवरदेव हसत हसत नाव घेण्यास सुरुवात करतो. 'छंद पकाइया-छंद पकाइया, छंद के ऊपर ताली, अगला छंत तब सुनाऊंगा. जब 5 पप्पी देगी साली.', असं नाव घेताच सर्वांना हसू आवरत नाही. इतकंच काय तर होणारी नवरीदेखील हसत दाद देते. दुसरीकडे नवरदेव असं नाव घेईल याची मेव्हणीला कल्पना देखील नव्हती. त्यामुळे तीही गाळातल्या गाळात हसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बातमी वाचा- Axle Counter Box: रेल्वेरुळाच्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये नेमकं काय असतं? जाणून घ्या

व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी दिले अशा रिअ‍ॅक्शन

इन्स्टाग्रामवर  jayan_shu2021 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "मला पण असंच नाव घ्यायची इच्छा आहे. त्यामुळे हे पाठ करून ठेवतो." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "हा व्हिडीओ सेव्ह करून ठेवा, लग्नात असंच नाव घ्यावं लागेल." तिसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'अरे भाई..नवरी अशी हसतंय खरी..नंतर चांगलाच धडा शिकवला असेल'